यवतमाळ शैक्षणिक

न.प.शाळा क्र. 2 घाटी महात्मा फुले जयंती चे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवर

न.प.शाळा क्र. 2 घाटी महात्मा फुले जयंती चे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न

घाटंजी :नगरपरिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2, घाटी घाटंजी येथे महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह, मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग आठवीच्या मुलींना सायकल वाटप व वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांकरता निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी घाटंजी शहरचे केंद्रप्रमुख श्री. रुपेश कावलकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. चंद्र प्रकाश वहाणे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुनील बोंडे साहेब,मानव विकास समन्वयक श्री. संजय पाथोडे सर, श्री. सम्राट खोब्रागडे सर, मुख्याध्यापक श्री. आशिष साखरकर सर, श्री. मो. नाजीर सर , शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण पडलवार सर व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. नरेश कुंटलवार हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले व यानंतर वर्ग आठवीच्या वर्गशिक्षिका कु. वृषाली अवचित मॅडम यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते वर्ग आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले .

यानंतर गटशिक्षणाधिकारी श्री. चंद्रप्रकाश वहाणे साहेब, श्री. संजय पाथोडे सर व श्री. रुपेश कावलकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाची सांगता सर्वांना स्नेहभोजन देऊन करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. वेणूताई मेश्राम, कु. वृषाली अवचित, सोनाली पेटेवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय गोलर, श्री. कृष्णा मडावी, श्री. वसंत सिडाम, श्री. तुषार बोबडे, श्री. नरेंद्र राठोड, सेवक श्री. नारायण डहाके, कांचनताई मेश्राम यांनी परीक्षण घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वृषाली अवचित यांनी तर प्रास्ताविक श्री. वसंत सिडाम व आभार प्रदर्शन श्री. नरेंद्र राठोड यांनी केले.

Copyright ©