यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात यावर्षी उभ्या राहिल्या सहा रोपवाटीका

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- पंकज तडस 

जिल्ह्यात यावर्षी उभ्या राहिल्या सहा रोपवाटीका

अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटीका योजना

रोपवाटीकाधारकांना 12.20 लाखाचे अनुदान

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटीका योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी 6 नवीन रोपवाटीका उभारण्यात आल्या आहे. रोपवाटीकाधारकांना 12 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन रोपांच्या उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेतून स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उल्पन्नात वाढ करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटीका उभारणी केली जात आहे.

या खाजगी रोपवाटीका योजनेचा लाभ घेण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड करतांना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते, महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांना पुर्वसंमती मिळाल्यापासुन 15 दिवसांच्या आत काम सुरु करुन तीन महिन्याच्या आत पुर्ण करणे आवश्यक आहे.

सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सहा रोपवाटीका नव्याने तयार करण्यात आल्या आहे. या रोपवाटीकाधारकांना 12 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी जवळच्या सुविधा केंद्रावरुन महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करु शकतात. यासाठी आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. योजनेच्या लाभासाठी शेतक-यांना एकदाच नोंदणी प्रक्रिया करावी लागते.

Copyright ©