यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे समता पर्वानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी

दिग्रस येथे समता पर्वानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित समता पर्व- २०२३ च्या भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी तालुका आणि शहरातील बौद्ध समाज बांधवांना मिळणार असून समता मैदान, जुने नगरपरिषद परिसर दिग्रस, येथे जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन समता पर्व- २०२३ चे अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी केले आहे.

 

या सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा ही.मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ सायंकाळी ५ ते रात्री १० वाजता राष्ट्रीय गायिका कडूबाई खरात यांचा,तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं! हा आंबेडकरी जलसा होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख, व समता पर्व २०२३ चे अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांच्या हस्ते होणार असुन.

बुधवार दि. १२ एप्रिल २०२३ वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० वाजता सत्र- १) जागर भिमाचा- सन्मान महिलांचा, सत्र- २) गोपाळराव आटोटे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान, विषय आंबेडकर चळवळीची दिशा, सत्र- ३) बाबा का जागले? का रडले? सादरकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ नागपूर, सत्र- ४) रमाई एकपात्री नाटक सादरकर्त्या- करुणा शिरसाठ यवतमाळ यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.

गुरुवार दि. १३ एप्रिल २०२३ वेळ सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार भाग्यश्री इंगळे, मुंबई यांचा भीमगीतांचा जंगी कार्यक्रम होणार आहे. या

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय राठोड अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा,प्रमुख पाहुणे वसंतराव घुईखेडकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक,प्रणित देवानंद मोरे संस्थापक अध्यक्ष जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड यांच्या प्रमूख उपस्थीतीत.

शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सामूहिक त्रिशरण पंचशील, दुपारी १२ वाजता सामूहिक अभिवादन कार्यक्रम, सकाळी १० ते १२ मोटरसायकल रॅली, आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच दिग्रस, सकाळी १० ते १२ वाजता गीत भीमायन- बुद्ध भीम गीतांचा आर्केस्ट्रा सादरकर्ते दासबाबू वानखडे आणि संच हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार भावना गवळी यवतमाळ वाशिम मतदार संघ, तर प्रमूख पाहुणे म्हणून सुधाकर राठोड तहसीलदार दिग्रस,मुकेश कोंडावार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिग्रस,धर्मराज सोनुने पोलीस निरीक्षक, ज्ञानेश सोनवणे मुख्याधिकारी नगरपरिषद दिग्रस, शिवलिंग राजपूत तालुका कृषी अधिकारी, रितेश बोबडे उपअभियंता एमएसईबी, डॉ. केसी बानोत तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजता भव्य अभिवादन रॅलीचा कार्यक्रम सादर होणार आहे.

शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सामुहीक त्रिशरण पंचशिल, दुपारी १२ वाजता सामुहीक अभिवादन कार्यक्रम व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. संचालन केटी जाधव, प्रस्तावना कैलास खंडारे तर आभार नंदकुमार शेळके हे करतील. सकाळी १० ते १२ मोटरसायक रॅली- आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, सकाळी १० ते १२ गीत भिमायन बुद्ध भीम गीतांचा आर्केस्ट्रा- सादरकर्ते दासबाबू वानखडे आणि संच, सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजता भव्य अभिवादन रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून ठराविक मार्गाने निघेल.

तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजन समिती अध्यक्ष धर्मराज गायकवाड, उपाध्यक्ष सनत तूपसुंदरे, कोषाध्यक्ष गिरीश अभ्यंकर, सह कोषाध्यक्ष दिनेश खाडे, सचिव ऍड. दत्ता खंडारे, सहसचिव सचिन कांबळे, कार्याध्यक्ष अमोल साळवे, नंदकुमार शेळके, सहकार्याध्यक्ष कपिल इंगोले, सुमित हातागळे, संपर्कप्रमुख जयप्रसाद मोहाडे, संदेश तूपसुंदरे, प्रसिद्धीप्रमुख जितेश बुरकुंडे, संघटक श्याम काजळे, राजकुमार साळवे, सहसंघटक निशांत बनसोड, सदस्य डॉ. कपिल मुनेश्वर, अजय कांबळे, श्याम उबाळे, शिवचरण बनसोड, गौरव खंडारे, चेतन खंडारे, अनिकेत गायकवाड, साहिल खंडारे यांनी केले आहे.

Copyright ©