यवतमाळ सामाजिक

विद्युत क.चां मनमानी कारभार,चुकीचे देयक देऊन ग्राहकांन कडून हजारो रुपयाची वसुली

विद्युत क.चां मनमानी कारभार,चुकीचे देयक देऊन ग्राहकांन कडून हजारो रुपयाची वसुली

रीडिंग न घेता अंदाजे रीडिंग चे देयक ग्राहकांची पदरी

भांब (राजा) येथील विद्युत कंपनीचा मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार सुरू असून विद्युत ग्राहकांची फसवणूक करून लूट करण्यात येत आहे.

भांब(राजा) येथील मीटर रीडिंग न घेताच अवाच्या सव्वा देयक देऊन लूट करण्याचा गोरख धंदा विद्युत कंपनीने सुरू केला आहे प्रथमच विद्युत देयकां मध्ये कमालीचा नको तो अधिभार लाऊन लूट करण्यात येत आहे तर आता रीडिंग न घेता देयक देऊन सक्तीने वसुली करण्यात येत आहे या बाबत ग्राहकांनी तक्रार केल्यास तुमचे मीटर फॉल्ट असल्याचे सांगून इतके बिल भरावेच लागते,असा लाईन मन कडून दम दिल्या जात असल्याने विद्युत कंपनी विरोधात तीव्र संताप वेक्त करण्यात येत आहे,गावात लाईन मन चिरी मिरी घेऊन अनधिकृत विद्युत पुरवठा घेण्यास अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे बोलल्या जात आहे.अनेक ग्राहक विद्युत कंपनीला त्रस्त झाले असून ग्राहकांची तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या विद्युत कंपनीवर कारवाई करण्यात यावी या परिसरात एकही रीडिंग घेणारे येत नाही अंदाजे रीडिंग देयकावर दिल्या जाते, त्या मुळे देयक मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना बिल दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना कामे सोडून चकरा माराव्या लागते,तरी ग्राहकाना अपमानास्पद वागणूक दिल्या जाते या कडे पालक मंत्र्यांनी लक्ष देऊन जनतेचे हित जोपासावे, व चुकीचे देयक देण्यात अधिकारी ,कर्मचारी यांचे वर कारवाई करण्याची मागणी सर्व सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

Copyright ©