यवतमाळ सामाजिक

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोजणी सुलभ व कालमर्यादेत जिल्हाधिकारी अमोल येडगे       

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोजणी सुलभ व कालमर्यादेत जिल्हाधिकारी अमोल येडगे  

भूमापन दिनी उत्कृष्ट भूमापकांचा सत्कार

यवतमाळ, दि १० एप्रिल :- मोजणी ही शेतक-यांच्या दैनंदिन जिवनातील महत्वाची बाब आहे. सरकारी मोजणी अचुक होत असली तरी यात बराच कालावधी लागतो. त्यामुळे मोजणीकडे जायचे नाही अशी मानसिकता मधल्या कालावधित शेतक-यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेत जमिनीची मोजणी सुलभ आणि वेळेची बचत करणारी ठरत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख विभागाद्वारे आयोजित भूमापन दिन कार्यक्रमात श्री येडगे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवदास गुंड, डायटचे प्राचार्य प्रशांत गावंडे उपस्थित होते.

 

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ई मोजणीची द्वितीय आवृत्ती येत आहे. ई मोजणीमुळे मोजणीचे काम आणखी सोपे होईल. मोजणी विभागात केवळ ७ मोजण्या प्रलंबित आहेत. या चांगल्या कामासाठी त्यांनी कर्मचा-यांचे अभिनंदन केले. वनहक्क दाव्यामध्ये चांगले काम मोजणी विभागाने केले आहे. त्यामुळे चांगला महसुल प्राप्त झाला. त्याचबरोबर वनहक्क प्राप्त लाभार्थ्यांना कमी वेळात मोजणी करुन त्यांचे सातबारे आपण तयार करू शकलो. मिळकत पत्रिका मिळत नाही अशा तक्रारी घेऊन लोक येतात, त्यांना तेव्हाच व्यवस्थितपणे समजुन सांगावे.

 

अर्जदारांना चांगल्या सेवा देण्याचे काम करू असा संकल्प आजच्या दिवशी करुया. तक्रारी निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ. सरकारी नोकरीत लोकांचे हक्क प्रमाणित करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालय करते. उपलब्ध सुविधा आणि साधन सामग्रीमध्ये तुम्ही ते करीत आहात. आणि त्यातही ते उत्तम आहे. प्रलंबित मोजण्या अतिशय कमी आहे ही बाब अभिमानाची आहे . आधुनिक तंत्रज्ञान सर्वानी शिकुन घ्यावे असे आवाहन करताना त्यांनी कायदा समजुन घेतल्यास अंमलबजावणी करणे सोपे होते असेही सांगितले. प्रत्येक भूमापकाने चांगले काम केले तर जिल्ह्याची चांगले काम करणारा जिल्हा अशी ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर शेतक-याला न्याय देता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणा-या भूमापकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख श्री गुंड यांनी प्रास्ताविकातुन मोजणी संदर्भातील माहिती दिली. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी यांना ताणतणाव व्यवस्थापन याबाबत प्रशांत गावंडे यांनी मार्गदर्शन केले.

Copyright ©