महाराष्ट्र सामाजिक

चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याची सांगता, सप्तश्रृंगी माता मंदिरात आयोजन

चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याची सांगता, सप्तश्रृंगी माता मंदिरात आयोजन

भक्तिमय नृत्य अविष्काराने घोराडवासी मंत्रमुग्ध

सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र घोराड येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता तथा स्थापना दिनानिमित्त संगीतमय भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

चैत्र नवरात्र उत्सव निमित् येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते काला महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रमाने तसेच संगीतमय भरूडाचे कार्यक्रमाने याची या उत्सवाची येथे सांगता झाली मंदिराचे सभागृहात ह भ प गणेश महाराज शिंदे नेरी यांच्या सुश्राव्य संगीतमय भारूडाचा आनंद श्रोत्यांनी अनुभवला यात विविध विषयांवर प्रकाश टाकीत हभप गणेश महाराज शिंदे यांनी विविधांगी भूमिका सादर करून नेत्रदीपक मातेचा गोंधळ करून श्रोत्यांची मने जिंकली मुलांसाठी गाडी, शेतीवाडी, माडी असे धनदौलत कमावून न ठेवता संस्काराचे धन द्या तुमच्या मुलाकडून तुम्हाला सुख मिळेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले संताच्या अभंगावर नृत्यविष्कार सादर करून टाळ्यांचा कडकडाट श्रोत्यांची वाहवा मिळविली यात त्यांना त्यांचे सहकारयांची साथसंगत लाभली यावेळी मंदीराचे वतीने या मंदिराच्या उभारणीस तथा विकास कामासाठी देणगी देणाऱ्याचा दुपट्टा नारळ पान देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला केजाजी महाराजांचे वंशज हभप विठ्ठल महाराज भादंककर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास घोराड ग्रामपंचायतीच्या सरपंचा ज्योती घंगारे, पिएस आय सुरेंद्र कोहळे, पोलिस पाटील निलेश गुजरकर आदी उपस्थित होते मंदिराचे वतीने प्रमुख अतिथींचा येथे शाल श्रीफळ व सप्तश्रृंगी मातेची प्रतीमा भेट देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गोमासे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजनासाठी सप्तश्रृंगी मातेच्या भक्त गणाचे सहकार्य लाभले

Copyright ©