Breaking News यवतमाळ

हिवरी येथील प्रवासी निवारा गेला चोरी

हिवरी येथील प्रवासी निवारा गेला चोरी

येथील मजबूत व मोठा प्रवासी निवारा हा अनेक वर्षा पासून चांगल्या अवस्थेत होता,अचानक त्या निवाऱ्या स पाडून त्या नीवाऱ्या चे लोखंडी मजबूत ऐंगल व लोखंडी खांब हि गायब झाले हि घटना मागील चार महिन्या पूर्वी घडली येथील प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागते, तीन चार गावातील प्रवाशांना आपला जीव कुठे लपवावा हे शोधावे लागते प्रत्येकाना उन्हाचे चटके सहन करत बस ची तासान तास वाट पहावी लागते शाळेत जाणारे विद्यार्थी सावली कुठे मिळते हेच शोधत रहाते हा सर्व प्रकार ग्रामपंचायत उघड्या डोळ्यानी पाहून मुंग गिळून बसला आहे या प्रकरणी ग्रामस्थानी सह्या निशी तक्रार दाखल करूनही ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही,जुन्या प्रवाशी निवाऱ्याची नाम मात्र दुरुस्ती करायची होती,त्याची दुरुस्ती न करता चक्क प्रवासी निवारा गायबच करण्यात आल्याने,याची अजूनही दखल घेण्यात आली नाही,हा प्रवासी निवारा पाडण्याची परवानगी कुणी दिली या निवाऱ्याचे साहित्य गेले कुठे असे अनेक सवाल सर्व सामान्य नागरिकांना कडून करण्यात येत आहे तर प्रवाशांना किती दिवस रस्त्यावर उभे राहावे लागणार! याची दखल त्वरित घेऊन हिवरी येथील पूर्वी असलेल्या प्रवासी निवाऱ्या प्रमाणेच नव्याने निवारा बांधून देण्याची मागणी करण्यात येत आहे,

Copyright ©