यवतमाळ सामाजिक

पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार,पाईप फुटला एकीकडे,खोदकाम केले दुसरीकडे

पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार,पाईप फुटला एकीकडे,खोदकाम केले दुसरीकडे

यवतमाळ येथील वाघापूर नाका या परिसरात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन मधील एक पाईप फुटला ,नेमका कोणता याचीच माहिती संबंधितांना नसल्याने नको त्या ठिकाणी रोड फोडून पाहणी केली,त्या ठिकाणी पाईप लाईन व्यावस्थित असल्याने तो खड्डा सोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला या अज्ञात अभियंता मुळे रोडचा सत्यानाश करण्यात आला या कडे मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व सामान्य जनते च्या पैशाची खैरात सुरू असल्याचे बोलल्या जात आहे अनेक ठिकाणी दुखणं हाताला,पट्टी पायाला असा प्रकार सर्वत्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता बनवण्यात येते,आणि लगेच त्याचे विदृपी करण केल्या जाते त्या वीदृपी कर्णाचा त्रास मात्र सर्व सामान्य जनतेला होतो हा प्रकार सतत सुरू असल्याने शहर वाशी त्रस्त झाले आहे.

Copyright ©