यवतमाळ सामाजिक

प्लास्टिक मुक्त शहरा करीता समता पर्वात दिली शप्पत

प्लास्टिक मुक्त शहरा करीता समता पर्वात दिली शप्पत

येथील पोस्टल ग्राउंड वर सुरू असलेल्या समता पर्व या कार्यक्रमात काल संध्याकाळी बोधिसत्व खंडेराव यांने उपस्थित जनसमुहाला एकेरी वापर प्लास्टिक विरोधी उपस्थितांना शपथ दिली. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात एकेरी वापर प्लास्टिक वापरू नये त्या वापराणे किती वाईट परिणाम होते याची माहिती देत ही शपथ देण्यात आली.

बोधिसत्व खंडेराव मागील दहा वर्षांपासून सामाजिक वनीकरण, जलसाक्षरता, ग्राम स्वच्छता, थुंकू नका आंदोलन व प्लॅस्टिक विरोधी चळवळीसाठी काम करत आहे. पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून त्याने एकेरी वापर प्लास्टिक विरोधी जनजागरण आंदोलन सुरू केले आहे. या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना एकेरी वापर प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगणे आणि घराबाहेर पडताना स्टेनलेस स्टीलचा ग्लास सोबत ठेवणे हा संदेश दिला जातो. घराबाहेर चहा-कॉफी-पाणी-ज्यूस किंवा सरबत पिण्यासाठी घरातील ग्लास वापरल्यामुळे संसर्गजन्य आजारांपासूनही बचाव होतो आणि एकेरी वापर प्लास्टिकचा वापरही टाळला जातो अशी या मागची भूमिका आहे.

ग्रामीण भागातील काही शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांना स्टीलचे ग्लास आणून दिले आहेत. काल समता-पर्वात उपस्थित साडेतीनहजाराहून अधिक लोकांना ही शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी माननीय अंकुश वाकडे व सौ प्रिया वाकडे आणि प्रज्ञा तांबेकर यांनी सहकार्य केले. विचार मंचावर बोधिसत्वसोबत अन्वेषा गुर्जर, इरावती गजभिये, विश्वा मालखेडे, समृद्धी दुपारे, साफुआ वाकडे, तनिष्क गुर्जर, कुमारी मडावी, काश्यपी दोंदल व इतर बालचमू उपस्थित होते. या शपथविधीला अंदाजे साडेतीन ते चार हजार लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोधिसत्व फाउंडेशनच्या संचालक अमृता खंडेराव यांनी केले. यानिमित्ताने लोकशाहीर संभाजी भगत आणि शपथविधीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलचे ग्लास भेट देण्यात आले. कोवळ्या वयातील मुलांना प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक एकेरी वापर प्लास्टिकचा वापर टाळावा हा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो.

हा पर्यावरण पूरक कार्यक्रम समता पर्व प्रतिष्ठान आणि बोधिसत्व खंडेराव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या शपथविधी द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©