यवतमाळ सामाजिक

सामाजिक न्याय विभाग महाज्योती आणि म. फुले जयंती उत्सव समन्वय समिती,यवतमाळतर्फे दि. ११ एप्रिल रोजी सामाजिक दुचाकी रॅलीचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन

सामाजिक न्याय विभाग महाज्योती आणि म. फुले जयंती उत्सव समन्वय समिती,यवतमाळतर्फे दि. ११ एप्रिल रोजी सामाजिक दुचाकी रॅलीचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन

सामाजिक न्याय विभाग, महाज्योती आणि म. जोतीराव फुले जयंती उत्सव समन्वय समिती यवतमाळ मार्फत मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सामाजिक दुचाकी रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे ही सामाजिक दुचाकी रॅली म. जोतीराव फुले पुतळ्यासमोरून सुरू होणार असून यवतमाळ शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीचा समारोप सायं. ६ वाजता म.फुले पुतळा चौकात होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण तसेच समन्वय समितीतील जोती बा दीनबंधू कल्याण मंडळ, सावित्रीआई फुले महिला मंडळ,क्रांतीसूर्य माळी युवा मंडळ,सत्यशोधक शिक्षक संघ, माळी महासंघ, सावित्री शक्तिपीठ, सत्यशोधक स्टडी सर्कल, माळी विकास बहुउद्देशीय संस्था, माळी महासंघ,

म.फुले सांस्कृतिक संघ, प्रयास बहुउद्देशीय स्वयंसहायता बचत गट, अ.भा. म. फुले समता परिषद, योगा ग्रुप वाघापूर इत्यादी संस्था तथा यवतमाळातील इतर समविचारी व सहविचारी संघटना सहभागी होणार आहे. या सामाजिक दुचाकी रॅलीमध्ये महिलांचा समावेश असून रॅली शांततामय व शिस्तशीर राहणार आहे. रॅलीमध्ये सर्वांना आपल्या कुटुंबासह सहभागी होता येणार आहे.

 

तसेच ,रविवार दि. ९ एप्रिल रोजी महाज्योती व महात्मा फुले सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दु. ३.३० वा. केमिस्ट भवन, शिवाजीनगर यवतमाळ येथे गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाज्योती व समन्वय समितीतर्फे दि.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शासकीय मुलींचे वसतिगृह सामाजिक न्यायभवनाजवळ, पळसवाडी कॅम्प येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. आणि दि.११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता म. जोतीराव फुले यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम समाज कल्याण विभाग, महाज्योती व जयंती उत्सव समन्वय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमांमध्ये मा. पालकमंत्री, मा.जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक,मा. मुख्याधिकारी, न. प. तथा अन्य मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सर्वच कार्यक्रमाकरिता सर्वांनीच उपस्थित रहावे तथा सामाजिक दुचाकी रॅलीमध्ये देखील उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण, यवतमाळ सहाय्यक आयुक्त भाऊरावजी चव्हाण, अधीक्षक जी.डी.राऊत तथा समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड अरुणराव मेत्रे व निमंत्रक संजय येवतकर यांनी केलेले आहे.

Copyright ©