यवतमाळ सामाजिक

जिल्हास्तरीय मेहेंदी आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेत लो. बा.अणे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींचा मोठ्या संख्येने सहभाग

जिल्हास्तरीय मेहेंदी आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेत लो. बा.अणे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींचा मोठ्या संख्येने सहभाग

स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती कला,वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव येथे दिनांक ०५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय मेहंदी आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत येणाऱ्या क्लस्टर प्रोग्रामच्या माध्यमातून लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ. मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव. इंदिरा महाविद्यालय कळंब. भारती महाविद्यालय,आर्णी. नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय,यवतमाळ. या सर्व महाविद्यालयाचा समावेश होता. लो. बा. अणे महिला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी ब्युटीपार्लर या क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि म्हणून ही कार्यशाळा स्वयं रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनींनी लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे एम. ए.भाग १,२ व बी.ए च्या गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाल्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रो. डॉ. संगीता घुईखेडकर मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी डॉ. रश्मी गजरे नानकी बाई वाधवाणी महाविद्यालय यवतमाळ. तसेच प्रा. सरोज लखदिवे इंदिरा महाविद्यालय, कळंब. डॉ. मनीषा क्षिरसागर भारती महाविद्यालय,आर्णी प्रा. मोनाली सलामे तसेच डॉ. सरिता देशमुख लो. बा. अणे महिला महाविद्यालय यवतमाळ या लाभल्या. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लो. बा. अणे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पुजा मानकर तर मेहंदी प्रशिक्षक म्हणून भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथील विद्यार्थिनी नंदिनी अमृतकर ही लाभली. पूजा मानकर हिने थ्रेडिंग, हेअर स्टाईल, क्लिनअप, फेशियल चे विविध प्रकार व ब्युटीपार्लर चे आजच्या काळातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देवून प्रात्यक्षिक दिले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन कु. मोनिका घोडे तर मयुरी खडसे हिने केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा. कल्पना कोरडे यांनी केले. तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनिषा क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सरिता देशमुख यांनी केले. तृतीय सत्रामध्ये अध्यक्षस्थानी वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख प्रा डॉ.प्रतिभा काळमेघ या लाभल्या. तृतीय सत्राचे सुत्रसंचालन कु.पूजा पठाडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मोनाली सलामे यांनी केले.

Copyright ©