यवतमाळ सामाजिक

पुणे फॅशन विक मध्ये यवतमाळच्या डॉ. अंजली गवार्ले यांचा सहभाग

पुणे फॅशन विक मध्ये यवतमाळच्या डॉ. अंजली गवार्ले यांचा सहभाग

यवतमाळ ः यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मुळव्याध, भगंदर तज्ञ डॉ. सौ. अंजली गवार्ले मेडिक्‍वीन मिसेस महाराष्ट्र (ऑर्गण्याझिग कमिटी) यांनी 31 मार्च हॉटेल वेस्टिनच्या, सर्वात ग्लॅमरस आणि प्रतिष्ठित पुणे फॅशन वीकमध्ये डिझायनर मंजू गढिया यांच्या 6 यार्ड्सच्या समर कलेक्शन चा फॅशन वॉक केला. डॉ. अंजली यांनी पारंपरिक, संस्कृतीक, खादी वस्त्र परिधान करून अप्रतिम दिसत होत्या. डॉ. अंजली गवार्ले या मिसेस महाराष्ट्र, मिसेस स्टार इंडिया फॅशन आयकॉन, मिसेस इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन वुमन ऑफ प्राईड २०२२ आहेत त्यांचा एनोरेक्टल सर्जरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २२-२३ मध्ये देखील समावेश आहे, तसेच अलीकडेच त्यांनी इजिप्त येथे कोलोप्रोक्टोलॉजी इंटरनॅशनल कॉन्फरन्सला वक्ता म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले. पुणे फॅशन वीक ची 31 मार्चपासून सुरूवात झाली. या संधीसाठी त्यांनी मेडिक्वीन मेडिको पेजेंटच्या अध्यक्षा डॉ प्रेरणा बेरी आणि सचिव डॉ प्राजक्ता शाह यांचे आभार व्यक्त केले. मेडिक्वीन मेडिको पेजेंट हे केवळ विवाहित महिला डॉक्टरांसाठी एक अद्वितीय पेजंट आहे हे केवळ सौंदर्य स्पर्धाच नाही तर सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या डॉक्टरांसाठी त्यां सोबतच कला, छंदाला संधी उपलब्ध करून देणारी स्पर्धा आहे. डॉ. माधवी खराडे, डॉ. अमृता बर्‍हाटे, डॉ. वैदेही पोटे, डॉ. सोनाली सिंग, डॉ. साम्राज्ञी कपाळे, डॉ. ज्ञानदा बांदोडकर, ह्या आठ मेडिक्वीनपुणे फॅशन वॉक साठी निवडल्या गेल्या.

Copyright ©