यवतमाळ शैक्षणिक

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात, कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात, कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थीनींच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. चंद्रकांतजी रानडे लाभले. उद्घाटक म्हणून नंदादिप फाऊंडेशनचे सर्वेसर्वा संदिप शिंदे हे लाभले. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी विनोद देशपांडे, मोहन जोशी व ॲड. उदय पांडे, इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी प्राचार्य कुंटे यांनी नंदादिप फाऊंडेशनच्या महान अशा कार्यासाठी आमचे महाविद्यालय नेहमी सहकार्यासाठी तत्पर राहू असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक संदिप शिंदे यांनी उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांसाठी पहिला गुरू आई व त्यानंतर शिक्षक कसे आपल्या जीवनाच्या वाटेवर महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले, तसेच समाजसेवेचे व्रत किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थीनींना सांगीतले. याप्रसंगी विविध विषयांमध्ये ज्या विद्यार्थीनींनी गुणानुक्रमे यश मिळविले त्यांना बक्षीसे तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच संगीत विभागाच्या एम.ए. भाग-2 संगीत विषयाच्या विद्यार्थीनी कु. सलोनी सुक्ते व कु संध्या रोहणकर यांची स्पर्धेसाठी निवड होवून आंतरराष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रकांतजी रानडे यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले व त्यांना प्रोस्ताहनपर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिकम विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर कुडमेथे यांनी केले. डॉ. राजश्री धर्माधिकारी यांनी पारितोषिक वितरणाचे संचलन केले.

कला, क्रीडा महोत्सवा अंतर्गत गीत गायन स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, वेशभुषा, एकल नृत्य, समुह नृत्य, परफेक्ट मॅचींग, रांगोळी स्पर्धा, आनंद मेळावा, 100 मी. दौड, लिंबू-चमचा स्पर्धा, पोतेदौड स्पर्धा, बेडूक उड्या इ. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थीनींनी सहभागी होवून कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवून दिला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी लेझीम नृत्य सादर केले. गीत गायन स्पर्धेचे परिक्षण प्रा. संतोष गोरे व प्रा. कमलेश देशपांडे यांनी केले तर वेशभूषा स्पर्धेचे परिक्षक प्रा. डॉ. कविता तातेड, प्रा. जान्हवी कुंटे, नृत्यस्पर्धेचे परिक्षण डॉ. सुधा खडके, प्रा. दर्शना सायम, मेहंदी स्पर्धा व परफेक्ट मॅचिंग स्पर्धेचे परिक्षण प्रा. जान्हवी कुंटे, प्रा. सपना दाढे मॅडम यांनी केले.

कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वितेकरीता सांस्कृति विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, प्रा. मोनाली सलामे, डॉ. सरिता देशमुख, डॉ. वैशाली वाटकर, प्रा. विराट घुडे, प्रा. चव्हाण, प्रा. सौरभ वगारे, प्रा. वानखडे, प्रा. सपना दाढे, वैभव चौधरी, प्रीती तिवाडे, नितीन वालदे, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले

Copyright ©