यवतमाळ शैक्षणिक

*भाऊसाहेब भोरे महाविद्यालयात मेहेंदी आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*

 

 
प्रतिनिधी

स्थानिकभाऊसाहेब भोरे शिवशक्ती कला,वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव येथे दिनांक 05/एप्रिल 2023 रोजी जिल्हास्तरीय मेहंदी आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत येणाऱ्या क्लस्टर प्रोग्रामच्या माध्यमातून लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ. मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव. इंदिरा महाविद्यालय कळंब. भारती महाविद्यालय,आर्णी. नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय,यवतमाळ. या सर्व महाविद्यालयाचा समावेश होता. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रो. डॉ. संगीता घुईखेडकर मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी डॉ. रश्मी गजरे नानकी बाई वाधवाणी महाविद्यालय यवतमाळ. तसेच प्रा. सरोज लखदिवे इंदिरा महाविद्यालय, कळंब. डॉ. मनीषा क्षिरसागर भारती महाविद्यालय,आर्णी. प्रा. मोनाली सलामे तसेच डॉ. सरिता देशमुख लो. बा. अणे महिला महाविद्यालय यवतमाळ या लाभल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोटूरवार यांनी ही कार्यशाळा विद्यार्थिनींकरिता स्वयंरोजगार करण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, महिलांमध्ये कार्यकुशलता हा गुण असून त्या गुणाचा उपयोग स्वयंरोजगाराकरिता करायला पाहिजे, आजच्या युगामध्ये नवीन पिढीने स्वयंरोजगार कसा करावा याबद्दल मत व्यक्त केले. तसेच रोजगारांमध्ये बचत गटाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे मत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. संगीता घुईखेडकर यांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अर्थसाह्य करणाऱ्या संस्था व बँक कोणत्या उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे तसेच स्वयंरोजगार करून समाजामध्ये आपले मानाचे स्थान निर्माण करावेआणि आपल्या मधील असलेल्या कलागुणांना वाव देऊन आपल्याला स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभे राहता येईल याविषय मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये 90 विद्यार्थ्यांनींनी भाग घेतला. या कार्यशाळेत सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लो. बा. अणे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पुजा मानकर तर मेहंदी प्रशिक्षक म्हणून भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथील विद्यार्थिनी नंदिनी अमृतकर ही लाभली. पूजा मानकर हिने,थ्रेडिंग, हेअर स्टाईल, क्लिनिप,फेशियल चे विविध प्रकार व ग्राहकाची मागणी याविषयी सविस्तर प्रात्यक्षिक दिले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन कु. मोनिका घोडे तर मयुरी खडसे हिने केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा. कल्पना कोरडे यांनी केले. तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनिषा क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सरिता देशमुख यांनी केले. तृतीय सत्रामध्ये वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख प्रा डॉ.प्रतिभा काळमेघ यांनी विद्यार्थिनींकरिता स्वयंरोजगार किती महत्त्वाचा आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थिनीनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा असे आपल्या वक्तव्यामधून सांगितले. तृतीय सत्राचे सुत्रसंचालन कु.पूजा पठाडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मोनाली सलामे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता बी. ए.भाग 1, 2,3 च्या सर्व विद्यार्थिनी, सौ.लढी ताई यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©