यवतमाळ राजकीय

ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य याची वचक संपुष्टात

हिवरी.
येथील ग्रामपंचायत चां कारभार सध्या कर्मचारी यांच्या मन मर्जी पणाने चालु असल्याने यात सर्व सामान्य नागरिक भरडल्या जात आहे , ग्रामपचांयती च्या हलगर्जी पणा मुळे येथील घर कर,पाणी कर याची वसुली न केल्याने सात लाखाच्या वर महावितरण क.देयक थकल्याने पाणी पुरवठयाचां विद्युत पुरवठा बंद करण्यात आला,त्या मुळे हिवरी ग्रामवाशियाना पाणी मिळालेच नाही तर पाण्यासाठी पायपीट करावी लागली,मागील आठ दिवस ग्रामविकास अधिकारी ठाकरे, व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावातील पाणी कर व घर पट्टी याची युद्ध पातळीवर वसुली केली,गावातील नागरिकांची पाण्या साठी होत असलेले हाल लक्षात घेता शाखा अभियंता मां.विकास तडस यांचेशी भ्रमण धोनी वरुन संपर्क केला व विद्युत पुरवठा पूर्वरत करण्याच्या विनंती वरुन तातडीने विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला मात्र ग्रामपंचायत कर्मच्याऱ्यानी जाणून बुजून पाणी पुरवठा सुरू केला नाही ,त्या मुळे त्या दिवशीही पाणी ग्रामस्थांना मिळाले नाहि सरपंच ,उपसरपंच आणि सदस्य यांचे कुणीही ऐकायला तयार नसल्याने एकाही पदा धिकार्यांची वचक संपुष्टात आल्याचे दिसून आले,एकाच कामा करीता दोन कर्मच्याऱ्याची नियुक्ती करण्यात आली ते काम एकच कर्मचारी करू शकते ते काम दोघात वाटण्यात आले जणू काही ग्रामस्थांच्या पैशाची खैरात सुरू असल्याचे दिसून येत आहे अशा मनमानी कारभारास कोण आळा घालणार हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांनना पडला आहे.

Copyright ©