यवतमाळ शैक्षणिक

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय केक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय केक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे दिनांक २०/०३/२०२३ रोजी जिल्हास्तरीय केक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत येणाऱ्या क्लस्टर प्रोग्रामच्या माध्यमातून लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ. मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव. इंदिरा महाविद्यालय कळंब. भारती महाविद्यालय,आर्णी. नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय,यवतमाळ. या सर्व महाविद्यालयाचा समावेश होता. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रो. डॉ. कल्पना कोरडे शिवशक्ती कला,वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगाव या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. संगीता घुईखेडकर मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा. तसेच प्रा. सरोज लखदिवे इंदिरा महाविद्यालय, कळंब. डॉ. मनीषा क्षिरसागर भारती महाविद्यालय,आर्णी या लाभल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंटे यांनी ही कार्यशाळा विद्यार्थिनींकरिता स्वयंरोजगार करण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, महिलांमध्ये कार्यकुशलता हा गुण असून त्या गुणाचा उपयोग स्वयंरोजगाराकरिता करायला पाहिजे, आजच्या युगामध्ये नवीन पिढीने स्वयंरोजगार कसा करावा याबद्दल मत व्यक्त केले. तसेच डॉ. कल्पना कोरडे यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध कार्यक्षेत्र उपलब्ध असून महिलांच्या मनामध्ये स्वयंरोजगार करण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. संगीता घुईखेडकर यांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अर्थसाह्य करणाऱ्या संस्था व बँक कोणत्या उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे तसेच स्वयंरोजगार करून समाजामध्ये आपले मानाचे स्थान निर्माण करावे असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेमध्ये १६० विद्यार्थ्यांनींनी भाग घेतला. या कार्यशाळेत सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लो. बा. अणे महिला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. संस्कृती जावळकर ही लाभली. तिने विविध केकचे प्रकार व त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करताना किंमत कशी ठरवावी, याविषयी सविस्तर प्रात्यक्षिक दिले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन कु.कल्याणी सक्रावत हिने केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोनाली सलामे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सरिता देशमुख यांनी केले. तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन कु. पूजा मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुवर्णा गादगे यांनी केले. तृतीय सत्राचे सुत्रसंचालन कु.पूजा पठाडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. मनीषा क्षिरसागर यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता एम. ए. भाग १, २ च्या सर्व विद्यार्थिनी, प्रीती तिवाडे यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©