यवतमाळ सामाजिक

आज झाडे लावणार तर उद्या श्वास घेणार,बोधिसत्व फाउंडेशनचे आव्हान

प्रतिनिधी
शुद्ध हवा ही प्रत्येक मनुष्याची नैसर्गिक गरज आहे. प्रदूषित हवेमुळे अनेक माणसे दमा-अस्थमा अशा वेगवेगळ्या फुफ्फुसाच्या आजारांना बळी पडत आहेत.
दिनांक 7 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यंत यवतमाळ येथील पोस्टर ग्राउंड वर ‘समता-पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने बीज संकलन करण्यात येणार आहे. या संकलित केलेल्या सर्व बिया जून महिन्यामध्ये सीडबॉल बनवण्यासाठी वापरण्यात येतील. तुम्ही आणलेल्या बियांचा आम्ही यवतमाळ हिरवेगार करण्यासाठी उपयोग करू. या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व मान्यवर श्रोत्यांनी दररोज कार्यक्रमाला येताना बिया घेऊन यावे आणि तिथे ठेवलेल्या खोक्यात जमा कराव्यात असे आव्हान केले आहे यात
आंबा, बोर, चिकू, कडूलिंब, कडू बदाम, सिताफळ, लिंबू कुठल्याही फळाच्या वाळलेल्या बिया आणाव्यात.
ज्या व्यक्तींना सीडबॉल तयार करता येत असेल त्यांनी एक एक सीड बॉल तयार करून आणावा. तयार केलेला सीडबॉल वर्तमानपत्राच्या कागदात किंवा जुन्या सुटी कापडात गुंडाळून आणावा; म्हणजे आतील बिया बाहेर पडणार नाहीत.
शाळेतील शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वाळक्या बिया जमा कराव्यात. आजकाल अनेक झाडांखाली वाळलेल्या शेंगा आणि बियांचा खच पडलेला असतो सर्वांनी या शेंगा आणि बिया पिशवीत जमा करून समता पर्वत आणून द्याव्यात असे आव्हान
बोधिसत्व खंडेराव समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ यांनी केले आहे.

Copyright ©