यवतमाळ राजकीय

साखरा सोसायटीत मानकर गटांचा दणदणीत विजय

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवर

साखरा सोसायटीत मानकर गटांचा दणदणीत विजय

उमेदवार 13 ही मोट्या बहुमताने विजयी झाले आहे

घाटंजी तालुक्यातील राजकीयदृष्टया अत्यंत महत्वाची आणि प्रतिषठेची समजली जाणारी आणि तालुक्यातून सर्व जनता ज्याच्या निवडणुकीच्या निकालांवर नजरा लावून बसून होत्या त्या ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था साखरा येथील आज निवडणूक पार पडली असून यात मानकर गटांची शेतकरी सहकार पॅनल आणि पवार गटांची शेतकरी परिवर्तन पॅनलनी 13 संचालकांच्या निवडीसाठी आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते त्यांची आज साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान घेण्यात आले असून एकूण 290 मतदानपैकी 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रिया 4 वाजेपर्यंत पार पडली आणि लगेच मत मोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला त्यात मानकर गटांचा दणदणीत विजय झाला असून त्यांचे 13 पैकी 13 ही उमेदवार निवडून आले आहे निवडूक निकाल जाहीर होताच मानकर गटांचे सर्व विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला त्यात विजयी उमेदवारांची खालील प्रमाणे नावे सर्वसाधारण खातेदार प्रतिनिधी म्हणून बाबुलाल रुपसिंग चव्हाण, विजय देवराव फुलुके,संदीप लक्समनराव कावडे, सागर शंकरराव मानकर,महेबूबखा हबीबखा पठाण,प्रशांत किसनराव राजूरकर,प्रणित प्रवीणराव ठाकरे,संजय नानाजी ठाकरे तर महिला प्रतिनिधी मतदार संघातून सौ.सुगंधा अंबादास कावळे,सौ वनिता हिरामण रंदये तसेच इतर मागास प्रवर्गातून सुशील पुरुषोत्तम मानकर आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतून श्री प्रकाश नथथु राठोड असे सर्व उमेदवार निवडून आले आहे

Copyright ©