यवतमाळ सामाजिक

सौर ऊर्जा प्ल्यांट,बनले शोभेची वस्तू सौर ऊर्जा प्ल्यांट लावण्यात आला तेव्हा पासूनच बंद

सौर ऊर्जा प्ल्यांट,बनले शोभेची वस्तू सौर ऊर्जा प्ल्यांट लावण्यात आला तेव्हा पासूनच बंद

हिवरी येथील ग्रामपंचायत यांच्या अधिकारात पाच लाख खर्च करुण पाणी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्ल्यांट लावण्यात आला या प्ल्यांट ला जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च करण्यात आले ज्या दिवसा पासुन हा प्ल्यांट लावला त्या दिवसा पासुन बंदच आहे हि गावा करीता केवळ एक प्रकाची शोभेची वस्तू म्हणून झाली आहे याची ग्रामपंचायतीने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही ते लाखो रुपये पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे येथील विद्युत देयक न भरल्याने पाच ते सहा दिवस गावातील पाणी पुरवठा बंद राहिला तरीही सौर ऊर्जा प्ल्यांट कडे एकाही पदाधिकार्यांनी लक्ष दिले नाही हा प्ल्यांट सुरू असता तर येथील नागरिकांना पाण्या करीता भटकंती करावी नसती लागली,या घटनेला जबादार कोण असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे ,गावातील प्रथमच पाणी पुरवठा सुरळीत नसून ग्रामपंचायत पदाधिकारी हे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने गावातील कारभार पूर्णतः ढेपाळला आहे,गावातील नाल्या बांधकाम करण्यात येत आहे ते काम पुर्णतः नियम बाह्य असल्याने या बाधकामावर अधिकारी व पदाधिकारी यांची विशेष मेहर नजर असल्याने याची चौकशी करण्यात यावी या पूर्वीही गावातील नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे,दर्जाहीन असल्याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आली मात्र चिरी मिरीच्या प्रकरणात दडपल्या गेले वरील दोन्ही प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

Copyright ©