यवतमाळ सामाजिक

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अठरा जागेसाठी ९४ उमेदवारांनी भरले अर्ज

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अठरा जागेसाठी ९४ उमेदवारांनी भरले अर्ज

ग्रामपंचायत गटात होणार चूरशी ची लढत

मागील एक वर्षापासून प्रशासक राज्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अखेर निवडणुकीचे बिगुल वाजले सोमवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये आज गर्दी पाहायला मिळाली दुपारी तीन वाजेपर्यंत १८ जागेसाठी ९४ अर्ज दाखल झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव उप बाजार समिती देवळी च्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण गटात ३८अर्ज दाखल झाले,इतर मागासवर्गीय गटात ०५ अर्ज दाखल झाले,महिलांच्या गटात ०८ अर्ज दाखल झाले,विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात ०३ अर्ज दाखल झाले,ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात १९ अर्ज दाखल झाले,आर्थिक दुर्बल घटक ०६ अर्ज दाखल झाले,अनुसूचित जाती जमाती गटात ०७ अर्ज दाखल झाले, व्यापारी व अडते गटात ०५अर्ज दाखल झाले, हमाल व मापारी गटात ०३ अर्ज दाखल झाले,असे एकूण ९४ उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहे.सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून अर्ज भरण्यासाठी अधिकारी म्हणून निलेश डलपे, व लता कठाणे यांनी काम सांभाळले.

कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव व उप बाजार समिती देवळी याच्यावर मागील अनेक वर्षापासून सहकार गट व काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने या गटाला चांगली लढत देण्याची शक्यता दिसत आहे.

Copyright ©