Breaking News महाराष्ट्र

समृध्दी महामार्गावर कारची ट्रकला धडक तिघांचा मृत्यू 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- पंकज तडस

समृध्दी महामार्गावर कारची ट्रकला धडक तिघांचा मृत्यू 

महाबळा परिसरातील घटना 

समृध्दी महामार्गावर नागपूर कडे जाणारी भरधाव कार समोरील ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी मध्यरात्रीचे सुमारास महाबळा परिसरात घडली भरत क्षीरसागर, फाल्गुनी सुरवाडे, ज्योती क्षीरसागर अशी मृतांची नावे आहेत

प्राप्त माहितीनुसार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील डॉक्टर मैत्रीणी समृध्दी महामार्गाने आपल्या एम एच ३७ जी ८५७८ क्रंमाकाचे कारने नागपूरकडे जात असताना महाबळा परिसरात रात्रीचे सुमारास कार समोरील ट्रक क्रंमाक एम एच ४० बीएल ८२३५ जाऊन आदळली ही धडक इतकी जोरात होती की यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला सदर अपघातात डॉ फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी ज्योती क्षीरसागर या कार चालवत असल्याची माहिती आहे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूचे ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून अधिक तपास सेलू पोलिस करीत आहे समृध्दी महामार्गावर भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे या महार्गावर कुठेही काही असा प्रकार घडल्यास तात्काळ मदत मिळणे कठीण झाले आहे कोणतीही व्यवस्था नसून इतरांना प्रवेश नसल्याने साधे पिण्याचे पाणी मिळत नाही पोलीसांनाही अपघात झाल्याचे कळताच मधात कुठुनही प्रवेश नसल्याने तात्काळ घटनास्थळी पोहचण्यास अडचणी येत आहे

Copyright ©