यवतमाळ सामाजिक

संकल्प फाउंडेशन चा भागीरथ पुरस्काराने विशेष सन्मान, पुरस्कार यवतमाळ करांना समर्पित

प्रतिनिधी
यवतमाळ शहरात, सामाजिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांचा, आम्ही यवतमाळकर फोरम, स्व. महाजन ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने भागीरथ पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो 2023 चा भागीरथ पुरस्कार दाभडी येथील वृद्धाश्रमाचे संचालक श्री खुशाल नागपुरे यांना प्रदान करण्यात आला तर विशेष सन्मान पुरस्कार, संकल्प फाउंडेशन यवतमाळ यांना देण्यात आला, सोबतच तेजस्विनी छात्रवास, ओवी फाउंडेशन या संस्थांना देखील गौरविण्यात आले, स्थानिक ज्येष्ठ नागरिक भवन येथे पार पडलेल्या भागीरथ पुरस्कार विशेष अतिथी रमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्री भरत वाटवानी उपस्थित होते, यांच्या शुभहस्ते गेल्या जानेवारी महिन्यात पोलीस भरती निमित्त महाराष्ट्रभरातून आलेल्या 54000 विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तब्बल महिनाभर भोजनाचीं व निवासाचीं व्यवस्था यवतमाळ शहरात करून महाराष्ट्रासाठी एक नवा पायंडा संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून पाडण्यात आला, ह्या उपक्रमाची दखल म्हणून काल झालेल्या सोहळ्यात संकल्प फाउंडेशन चा सत्कार करून विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, या उपक्रमाकरिता यवतमाळ शहरातील सर्व सामाजिक संस्था, पतसंस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, प्रशासनिक संघटना, पोलीस प्रशासन व विशेषतः ह्या महायज्ञ च्या रथाचे सारथ्य करणारे, श्री सुरेश राठी, प्रा. घन:श्याम धरणे, प्रदीप ओमनवार, अनंत कॊलगीकर, प्रशांत बनगिनवार, ठाणेदार मनोज केदारे, प्रवीण देशमुख, अनिल गायकवाड व सर्व सेवाभावी यवतमाळकर व संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, च्या टीमला हा सन्मान समर्पित करण्यात आला, यावेळी संकल्प फाउंडेशन च्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके, सहसचिव रवी माहुरकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी ठाकूर, राजेंद्र गावंडे,रामराव मोरे,नितेश यादव, पंकज पंडित मनोज तामगाडगे, रवी कडू, अरुण सरागे, सिद्धार्थ मुजमुले, तर संकल्प वनिता वाहिनीच्या उपाध्यक्षा, वर्षा सरागे, सचिव संगीता टिप्रमवार, सहसचिव पूनम शेंडे, नेहा पंडित स्नेहल रेचे, उपस्थित होत्या

Copyright ©