यवतमाळ सामाजिक

विद्युत क.देयक न भरल्याने हिवरीतील पाणी पुरवठा बंद,

विद्युत क.देयक न भरल्याने हिवरीतील पाणी पुरवठा बंद,

दोन दिवसात पाणी पुरवठा सुरू न केल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयावर हिवरी ग्रामस्थ धडकणार

येथील मागील आठवड्या पासून पाणी पुरवठा बंद झाला आहे,ग्रामपंचायत नी विद्युत देयक न भरल्याने विद्युत कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला आहे,त्या मुळे गावातील पाण्याचा हाहाकार सुरू झाला आहे,येथील अंशी टक्के मजूर वर्ग आल्याने सध्या शेतीचे कामे सुरू आहेत मजुरांना आपले काम बंद ठेऊन पाण्या साठी सकाळ पासून पायपीट करावी लागते कधी या विहिरीवर तर कधी त्या हातपंपावर लाईन लाऊन वेळ खर्ची घालावा लागतो ,ग्रामापच्यायतिने वसुलीच केली नसल्याने हि वेळ ग्रामपंचायतीवर आलेली आहे,सतत वसुली केली असती तर ग्रामस्थांना या संकटाला सामोरे जावे लागले नसते,येथील ग्रामपंचायतीचा कारभार पुर्णतः मनमानी कारभार झाल्याने अनेक गैर प्रकाराला चालना मिळत आहे,येथील मागील आठवड्या पासून बंद असल्याने हा पाणी पुरवठा त्वरित सुरू न केल्यास ग्रामपंचायतीस कुलूप लावून जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

Copyright ©