यवतमाळ सामाजिक

समता पर्व २०२३, यवतमाळ चे ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भव्य आयोजन

समता पर्व २०२३, यवतमाळ चे ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भव्य आयोजन

शाहीर संभाजी भगत यांचा

आंबेडकरी जलसा

कृतिका व रसिका बोरकर बहिणींचा संगीतमय कार्यक्रम

९ एप्रिलला जगातील सर्वाधिक शिक्षण घेतलेल्या मान्यवराकडून उद् घाटन

यवतमाळ आयडलची संगीतमय मेजवानी

 

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज घटकात समतेची मूल्य रुजावीत आणि भारतीयत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतुने समतापर्वाचे भव्य आयोजन दिनांक ७ एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान करण्यात आले आहे.

समतापर्वाची सुरुवात दि ७ एप्रिल २०२३ ला सकाळी ११.०० वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायंकाळी ६.०० वाजता वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय खाजगीकरणामुळे देशाची प्रगती की अधोगती ? असा ठेवण्यात आलेला आहे. सायंकाळी ७.०० ते १०.०० दरम्यान देशातील गाजलेले लोकशाहीर संभाजी भगत यांचा *विद्रोही आंबेडकरी जलसा, मुंबई* हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद् घाटन मा.प्रज्ञा नरेंद्र फुलझेले प्रशासकीय अधिकारी अमरावती, यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी पवन लताड यांना सत्यशोधक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. दिनांक ८ एप्रिल २०२३ ला *हिट्स ऑफ म्युझिक शो* बॉलिवूड पार्श्वगायिका मुंबई सारेगामा झी टीव्ही सेलिब्रिटी कृतिका व रसिका बोरकर यांचा *संगीतमय मनोरंजनात्मक कार्यक्रम* संपन्न होणार असून या कार्यक्रमाला नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ ला समतापर्व २०२३ चे भव्य उद् घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले व ज्यांनी १२८ पदव्या व १७ पीएच.डी.करून जगामधील सर्वात अधिक शिक्षण घेण्याचा बहुमान प्राप्त झालेले *डॉ. पी जे सुधाकर* आय. आर. एस. विशाखापट्टणम, यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष समतापर्वाचे संस्थापक डॉ. हर्षदीप कांबळे सचिव उद्योग महाराष्ट्र राज्य, मा.नरेंद्र फुलझेले अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा व प्रसिद्ध समाजसेवक मा.रवी कीर्ती कर्नाटक यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी त्यांना *महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे* याच वेळी *एक क्षण गौरवाचा* हा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार 2023 प्रवीण देशमुख यांना तर समता शोधवार्ता पत्रकारिता पुरस्कार किशोर वंजारी नेर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक १० एप्रिल २०२३ ला समतापर्वचे प्रमुख आकर्षण असणारा यवतमाळ आयडॉल चे उद् घाटन मा.

अनिल रामजी आडे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन अभियंता दीपक नगराळे हे करणार आहेत. यावेळी *दुसरे समता विचारवेध सत्र* या सत्रात बदलत्या शिक्षण पद्धतीत भारताचे भविष्य यावर प्रमुख वक्ते मा. डॉ. टी. यु. फुलझेले , इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. यावेळी आदिवासी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे मा. सुधाकर मसराम यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक ११ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ३.०० ते ६.०० दरम्यान सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी संपन्न होणार आहे. तिसऱ्या समता विचारवेध सत्रामध्ये *भारत का संविधान और राष्ट्रवाद की संकल्पना* या विषयावर दिल्ली येथील प्रसिद्ध वक्त्या डॉ. शैलजा सिंह आर्या या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दादाराव डोल्हारकर , प्रशासक व मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ हे राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ८.०० ते १०.०० च्या दरम्यान चवथे विचावेध सत्र *भारतीय लोकशाही के चार स्तंभ और आज की राजनीति* या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक मा.

डॉ. ओम सुधा ,दिल्ली यांचे व्याख्यान संपन्न होणार असून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे राहणार आहेत. दिनांक १२ एप्रिल २०२३ ला महिलांची सर्वांगीण उन्नती आणि विकासात्मक दृष्टिकोनातून वूमन आयकॉन पारंपारिक वेशभूषेचा कार्यक्रम संपन्न होणार असून याच दिवशी सायंकाळी ७.००ते ८.०० च्या दरम्यान *पाचव्या समता विचारवेध* सत्रामध्ये संपूर्ण भारतामधील प्रसिद्ध वक्ते मा.प्रा. लक्ष्मण यादव हे *भारतीय राजनिति में ओबीसी का आंदोलन* या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा .माधुरी अनिल आडे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक मा.संतोष अरसोड यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्रात इग्नू दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रमुख व्याख्यात्या मा.डॉ. कौशल पवार यांचे महिला सशक्तिकरण और फुले शाहू आंबेडकरी विचारधारा या विषयावर प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. याच परिसंवादामध्ये नागपूर येथील प्रसिद्ध सामाजिक सेवेमध्ये अग्रणी असणाऱ्या मा.जोहराई कांबळे यांना *माता रमाई त्यागमूर्ती राष्ट्रीय सन्मान पुरस्कार* प्रदान केल्या जाणार आहे. सोबतच *मा.राजश्रीताई हेमंत पाटील यांना क्रांतीज्योती सावित्री आई राष्ट्रीय सन्मान पुरस्कार* दिला जाणार आहे. दिनांक १३ एप्रिल २०२३ ला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड, आमदार मदन येरावार, ऍड. शिवाजीराव मोघे, मा. माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, मा.तारीक मोहम्मद शमी लोखंडवाला, मा.भाई अमन, मा.बाळासाहेब रास्ते, मा.नरेंद्र गद्रे, मा.धनंजय तांबेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध संशोधक पत्रकार अविनाश साबळे यांना मूकनायक पत्रकार पुरस्कार केल्या जाणार आहे. यासोबत १४ एप्रिल ला सकाळी भीम पहाट या अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून मा.वंदन राऊत आणि त्यांचा समूह सदर कार्यक्रम सकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान चौक येथे सादर करणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला समता पर्वाचे अध्यक्ष अभियंता मनोहर शहारे , कार्याध्यक्ष अभियंता संजय मानकर ,नामदेव थूल ,उपाध्यक्ष अशोक तिखे घनश्याम नगराळे, शैलेश गाडेकर, मनीषा तिरणकर, विद्या खडसे, माधुरी ढेपे, सचिव ऍड. रामदास राऊत, सहसचिव ऍड. राहुल पाटील, अंकुश पाटील, कोषाध्यक्ष अभियंता दीपक नगराळे, बळीराम अडागळे, डॉ. चंद्रकांत सरदार, जे. डी. मनवर, नारायण थुल, घनश्यामजी भारशंकर ,धिरज वाणी सुरज खोब्रागडे, शंतनु देशभ्रतार, संजय तरवरे, महिला मुख्य संघटिका प्रमोदिनी रामटेके, विजय मालखेडे, प्रवक्ता प्रा. काशिनाथ लाहोरे व मुख्य संयोजक प्रा. अंकुश वाकडे व समस्त समतापर्व कार्यकारिणी यांची उपस्थितीत होती.

.

Copyright ©