यवतमाळ शैक्षणिक

अहिंसा मॅरेथॉनमध्ये धावले २०० जैन-अजैन बांधव

अहिंसा मॅरेथॉनमध्ये धावले २०० जैन-अजैन बांधव

यवतमाळ – भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखा, जैन युवा समिती, जैन सेवा समिती आणि जोश फाउंडेशन यवतमाळच्या वतीने शहरात एकता अहिंसा शांतीचा संदेश देण्यासाठी पोस्टल ग्राऊंडवर अहिंसा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉनचे उद्‌घाटन उद्योजक नरेंद्र गनेडीवाल, जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, इंदरचंद बैद यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनची सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये जवळपास २०० जैन-अजैन बांधवांनी सहभाग नोंदविला. २ किलो. मीटर ३ किलो. मीटर ५ किलो. मीटर मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. पोस्टल ग्राऊंड येथून प्रारंभ झालेली हि मॅरेथॉन स्टेट बँक चौक, वाघापूर नाका, कलेक्टर ऑफीस, ओल्ड बसस्टेशन, सिटी पोलीस स्टेशन, तिरंगा चौक मार्गे पोस्टल ग्राऊंड येथे विसर्जीत झाली.

Copyright ©