महाराष्ट्र सामाजिक

सामाजिक स्वास्थ वर्धक उपक्रम काळाजी गरज- खासदार तडस

देवळी ता.प्रतिनिधी:सागर झोरे

सामाजिक स्वास्थ वर्धक उपक्रम काळाजी गरज- खासदार तडस

आरोग्य शिबीराचे आयोजन हेल्थ केअर फाऊडेशन देवळी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता

कोविड १९ या जागातिक स्तरावर महामारीने सपूर्ण जीवन ढवळून निघाले अनेक क्षेत्रात यांचे वितपरीत दुरगामी परीणाम अनुभवास येत आहे शासकिय स्तरावरून कोरोनाच्या त्या काळात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या तरीही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात वंचित राहिला. अशा वेळी सामाजिक संस्थानी सामाजिक दायित्वाचे भान राखून ग्रामीण जनतेला आवश्यक मार्गदर्शन व स्वास्थवर्धक सुविधा उपलब्ध करून दिल्या.सामाजिक स्वास्थ वर्धक उपक्रम काळाजी गरज बनली आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आरोग्य शिबिर व कोरोना योद्धांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

शिबिराच्या अध्यक्षस्थांनी माजी खासदार सुरेश वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया शोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही न.प. माजी उपाध्यक्ष नरेद्र मदनकर जेष्ठ पत्रकार शेख सत्तार, राजु लभाने, चेतन पेंदाम यांची उपस्थिती होती.

क्रार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज व् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून करण्यात आली.यावेळी इमरान राही व नरेद्र मदनकर यांनी उपक्रमाबदल स्तुती व्यक्त करून असे क्रार्यकम जागोजागी व्हावे असे सागितले माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी रक्तदान श्रेष्नदान असल्याचे सागून जास्तीत जास्त रक्तदान करून मदत करावी असे सांगितले.खासदार रामदास तडस यांच्या जन्मदिना निमित्य हेल्थ केअर फाऊडेशनच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबिर मातोश्री हॉस्पीटल मध्ये घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेल्थ केअर फाऊडेशनचे संस्थापक प्रकाश खडगी जिल्हा अध्यक्ष गणेश शेंडे यांनी केले यावेळी कोरोना योद्धा डॉ.हेमत गोल्हर डॉ.अश्विनी गोल्हर डॉ.इद्रप्रसाद

फुटाने डॉ. चंदारानी फुटाने डा. उत्सव शेंडे डॉ.भांगे जेष्ठ पत्रकार सत्तार शेख हेल्थ केअर फाऊडेशचे जिल्हा अध्यक्ष गणेश शेंडे रक्त संकलन रेबो ब्लड बॅक नागपूर यांनी कले तर स्थानिक डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. संचालन कल्पना फुसाटे वर्धा तर आभार आरती डोरले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव शुभांगी खडगी गुडु पाळेकर अजय देशमुख अशोक टावरी महेद्र कामडी सचिन वैघ मुकूंद बजाईत मगला भाजीपाले सलीम शेख मीनल तिवारी सागर झोरे आदिनी सहकार्य केले.

Copyright ©