यवतमाळ सामाजिक

प्रा.आ.केंद्र सायखेड येथे किशोरवयीन मुला मुलींचा पिअर एज्यूकेटर मेळावा संपन्न

लाडखेड प्रतिनिधि अन्सार खान 

प्रा.आ.केंद्र सायखेड येथे किशोरवयीन मुला मुलींचा पिअर एज्यूकेटर मेळावा संपन्न

आज दि.1एप्रिल2023 रोजी प्रार्थमिक आरोग्य केंद्र सायखेड येथे मा.जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण व मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.सी.बानोत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियाना मधील राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत ‘पिअर एज्यूकेटर मेळावा’ आयोजित करण्यात आला शासना द्वारे किशोरवयीन मुला- मुलीन साठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवे ची माहिती डॉ.राजकुमार दुधे, डॉ.शिवानी सुरोषे यांनी दिली. तसेच किशोर वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल व त्यासाठी आरोग्य विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सोई सुविधा तसेच पिअर एज्यूकेटर ने आपल्या गावातील समवयस्क किशोरांचे समन्वयक म्हणून कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सायखेड ग्राम पंचायत चे उपसरपंच मधुकर कूडे व समाजसेवक प्रमोद यंगड, मार्गदर्शक म्हणून संदीप वाघ व प्रवीण नगराळे उपस्थित होते.या कार्यक्रमा चा लाभ गावातील व परिसरातील किशोरवयीन मुला- मुलींनी घेतला.कार्यक्रमा चे सूत्र संचालन डॉ.चावके व गोकुळे यांनी केले व श्रीमती किन्हिकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रदीप काळुसे, , सुमित डोंगरे , गणेश हेडगिर,अतुल गुल्हाने, विजय रत्ने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Copyright ©