यवतमाळ सामाजिक

“राम नामाच्या जयघोषाने मंगरूळ दुमदुमले”

“राम नामाच्या जयघोषाने मंगरूळ दुमदुमले”

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ , ता. जि. यवतमाळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने ” श्री रामनवमी ” निमित्त प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

मारोती मंदिर, आठवडी बाजार येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. टाळ- मृदंगाच्या तालाने आणि रामनामाच्या जय घोषाने गावात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते. गावातील सुहासिनींनी दारासमोर रांगोळीचे सुंदर रेखाटन केले होते.सुहासिनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून आरतीने ओवाळणी करीत होत्या.

मीराताई ठाकरे, नंदा सोनटक्के, बहिणाबाई कोडापे, सुशिला राऊत, कुसुम गावंडे, उज्ज्वला ठाकरे, प्रतिभा गावंडे, सुमित्रा मोडले, राधा मोडले, गोतेताई, अनुसया कोपरकर, शकुंतला पोहोरकर, शोभा गावंडे, सुनिता भागडे, निशा कोपरकर, ललिता भालके, साधना खेरे, लता पोहरकर, लता सूर्यकार, मंजू इंगळे, प्रांजली इंगळे , मयूरी गावंडे, ताई इंगळे, पार्वती गाडगे, कीरण इंगळे, रूपाली इंगळे ,तारा पोहोरकर, वेणू इंगळे, चंदा गावंडे , रेणू खेरे,भारती ठाकरे, माया भागडे, विद्या गावंडे, दुर्गा गावंडे,लीला पोहोरकर,सीमा जाचक, विठ्ठल कोडापे, डॉ अनंतकुमार सूर्यकार, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, संजय कांबळे, महादेव तुमडाम, सुनील गिरपुंजे, गणेश सोनोने, शंकर पोहोरकर, दत्ता इंगळे, गजानन मोडले, अभय सोनटक्के, मोहन ठाकरे, मिलिंद ठाकरे, राजेश खेरे, प्रकाश गावंडे , नारायण सूर्यकार, गोपाल उईके, नामदेव गावंडे, रामदास मडावी, दीपक हारे, साहिल खेरे, देवा पोहोरकर, रूद्रा खेरे, साहू इंगळे व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमुळे शोभायात्रा शोभायमान झाली.

मारोती मंदिरामध्ये शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य आरती होऊन गोपाल काल्याचे वाटप करण्यात आले.

डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या सर्व घटकांचे आभार मानले.

Copyright ©