Breaking News विदर्भ सामाजिक

ऐकाच आठवड्यात कर्जाच्या डोंगरामुळे देवळी तालुक्यात दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या

 

*कर्जबाजारी शेतकरी भूषण मानकर णे विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या….*

*ब्यांकसह खाजगी कर्ज होते थकबाकी*

देवळी प्रतिनिधी: सागर झोरे

देवळी तालुक्यातील गिरोली येथील राहिवासी भूषण रामभाऊ मानकर वय.३८वर्ष यांनी आपल्या स्वतःच्या लागून असलेल्या चुलत भावाच्या विहिरी मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना दि.२८मार्च २०२३ रोजी दुपारी ३वाजताच्या दरम्यान सुमारास घडली.
त्यांच्या या अश्या अचानक निघून जाण्याने परिवारातील लोक व आप्तस्वकीय हळहळ व्यक्त करीत आहे.गावात शोकाकुलाचे वातावरण निर्माण झाले होते.भूषणच्या पशच्यात त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी सारिका मानकर व दोन मुले आणि ऐक लहान भाऊ एक बहीण व आई वडील असा आप्त परिवार आहे.
भूषण मानकर हा गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शेती करीत होता.त्यावरच त्याच्या कुटुंबियांची उपजीविका भागत असे.मात्र गेल्या काही वर्षामध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे शेतात पीक झाले नाही.मात्र जवळपास पाच ते सहा लाख रुपये व खाजगी कर्ज झाले होते.त्यामुळे तो सतत तणावात राहत होता.यातच त्याने आपल्या शेताला लागून असलेल्या चुलत भावाच्या शेतातील विही्रीमध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.त्यामुळे गावात शोकाकुल पसरला आहे.
सतत होत असलेली नापिकी मुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर होत आहे त्यामुळे शेतकरी आपली जीवन यात्रा संपवत आहे.अशाताच देवळी तालुक्यातील ऐकाच आठवड्यात दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे तसेच सतत होणाऱ्या आत्महत्येने शेतकऱ्याच्या मनावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच शेतकरी मृतक भूषण मानकर यांच्या पत्नीने सांगितले की माझे पती गेल्या काही दिवसा पासून वि्वेंचत राहत होते मी त्यांना विचारले असता कि त्यांनी सांगितले कि आपल्यावर लाखो रुपये चे कर्ज आहे आणि सतत पीक पाणी पण बरोबर होत नाही आहे तर आपले घर कशे चालेल व मुलांचे शिक्षण कसे करावे याची चिंता मला पडली आहे त्यामुळे मी त्यांना आधार देत सांगितले कि सर्व काही बरोबर होईल तुम्ही काळजी करू नका काही तरी मार्ग निघेल असा मी त्यांना नेहमी समजून सांगत होते.
तसेच मृतक भूषण मानकर यांच्या वडीलासह गावकऱ्यांनी त्यांच्यावर असलेले कर्ज माफ करावे आणि मुतकाच्या मुलाचा शिषणाचा सांभाळ शासनाने करावा अशी मागणी केली आहे.
पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.

Copyright ©