अधिकारी का? बसले गप्प !
यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे
यवतमाळ:-येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविद्यालंय व रुग्णालंय या ठिकाणी क्ष – किरण विभागा मधे एक्स रे आणी सीटी स्कॅन फिल्म खरीदी मध्ये कोट्यावधिचा घोटाळा झाल्या बाबत संघपाल चारंदास बारसे यांनी अधिष्ठाता श्री वसंतरावनाईक शासकीय वैध्यकीय महाविद्यालंय व रुग्णालंय यवतमाळ यांच्या कडे या प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे परंतु अधिष्ठाता यांच्या कडून कुठलीही प्रकारची कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे संबधित प्रकरणी तक्रार दाखल केली असतानाही अधिष्ठाता यांचे गप्प बसणे संशयास्पद दिसून येत आहे याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ,या रुग्णालयातील अनेक गैर प्रकार असल्याचे सांगण्यात येत असून या गैर प्रकारात अनेकांचे हात असल्याने हे प्रकरण दडपण्याचा मार्गावर असल्याचे बोलल्या जात आहे.
Add Comment