Breaking News यवतमाळ सामाजिक

सौ शोभा चन्द्रशेखर निमकर सर्वोतकुष्ट आशा स्वयंसेविका म्हणून सम्मानित

 

लाडखेड प्रतिनिधि अन्सार खान 

दिनांक 29 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दारव्हा येथे आशा स्वयंसेविका दिवस साजरा करण्यात आला व त्या कार्यक्रमात वार्षिक कामा चा अहवाल तपासून आशा स्वयंसेविकांना पुरस्कार वितरण करण्यात आले त्या मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी अरब अंतर्गत येणाऱ्या लाडखेड येथील आशा स्वयंसेविका सौ शोभा चंद्रशेखर निमकर यांची सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली व त्यांना पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमा चे अध्यक्ष दारव्हा तालुका वैधकिय अधिकारी डॉ कुष्णकुमार बानोत होते व वैधकिय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय दारव्हा डॉ विक्रमसिंह कदम प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी अरब चे वैधकिय अधिकारी डॉ रीता सातपुते प्राथमिक आरोग्य केंद्र सायखेड़ा चे वैधकिय अधिकारी डॉ राजकुमार दुधे प्राथमिक आरोग्य केंद्र मंगकीन्ही चे वैधकिय अधिकारी डॉ माधवी कोकरे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव चे वैधकिय अधिकारी
डॉ ज्ञानेश्वर पवार प्राथमिक आरोग्य केंद्र बोदेगांव चे वैधकिय अधिकारी डॉ आमोद सराफ समूह संघटक राहुल निमकर गट प्रवर्तक सौ वंदना दुधे सौ सीमा धातोड़ व दारव्हा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या लाडखेड मध्ये प्रथम पुरस्कार मिळाल्या ने सौ शोभा चंद्रशेखर निमकर यांना गांवकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे व सुभेच्छानचा वर्षाव होत आहे

Copyright ©