Breaking News यवतमाळ शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड येथे शिक्षण परिषद संपन्न

प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूड इजारा केंद्र तिवसा यांचे वतीने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या शिक्षण परिषदेत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती दीपिका गुल्हाने ह्या होत्या तर मा. प्रमोद सूर्यवंशी शिक्षण अधिकारी प्रमुख अतिथी होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख काठोळे तीवसा यांनी केले तर प्रमोद सूर्यवंशी शिक्षण अधिकारी यांनी शिक्षकांनी आपल्या कर्तव्याविषयी एकनिष्ठ राहण्याबाबत आव्हान केले आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता विविध उपक्रम आपल्या शाळेत घ्यावेत तसेच निपुण भारत अध्ययन निष्पत्ती इत्यादी उपक्रम विषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूड ईजारा शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषा गणित इंग्रजी कला विषयाच्या केलेल्या विविध ऍक्टिव्हिटी चे कौतुक केले श्रीमती दीपिका गुल्हाने यांनी अध्ययन निवृत्ती श्रीमती वैशाली गायकवाड विषय साधन व्यक्ती यांनी बालरक्षा,बाबत माहिती दिली, महेश जनबंधू यांनी विविध शैक्षणिक उपक्रम या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश ढोबळे सदस्य राजकुमार मुंडे प्रमुख अतिथी प्रीतीताई अंभोरे प्रकाश गायकवाड केंद्रातील सर्व शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन गणेश चौधरी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्याम माळवे यांनी केले

Copyright ©