यवतमाळ सामाजिक

आम आदमी पक्षा कडून वीजदर वाढ रद्द करण्याची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री साहेबांना मागणी

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवर

आम आदमी पक्षा कडून वीजदर वाढ रद्द करण्याची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री साहेबांना मागणी

घाटंजी:- सामान्य ग्राहकांना आर्थिक समस्या निर्माण करणारी वीज दरवाढ रद्द करण्यासाठी आम आदमी पक्षाचा वतीने तहसीलदार यांचा मार्फत मुख्यमंत्री यांना वीज दरवाढ रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. राज्यात वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरण कंपनी विजेच्या दरामध्ये सरासरी ३७ टक्के वाढ करत आहे. प्रति युनिट २.५५ रुपयांची प्रचंड वाढ होणार आहे. गेल्या २३ वर्षातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी, छोटे उद्योगधंदे आदींवर अन्याय होणार आहे. महावितरणच्या या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करत आहे. महावितरण कंपनीने रेकॉर्ड ब्रेक दरवाढी केली आहे. या दरवाढीमुळे सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट इतकी वाढ आहे. स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्ही आकारात वाढ होणार आहे. वीज नियामक आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षात प्रथमच करण्यात आलेली ही प्रचंड दरवाढ आहे. कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करता कामा नये, असे विद्युत अपीलीय प्राधिकरणाचे आदेश आहेत. पण या आदेशांना हरताळ फासून ही दरवाढ महावितरण मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही होणारी दरवाढ अन्यायकारक असून या विरोधात आम आदमी पक्ष संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करत आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना वीज दर वाढ करणे अत्यंत गंभीर बाब आहे. एकीकडे दिल्लीची अरविंद केजरीवाल सरकार जनतेला २०० युनिट व पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचे सरकार जनतेला ३०० युनिट विज मोफत देत आहेत. या सोबतच अनेक सुविधा जनतेला काही अतिरिक्त कर न वाढवता आम आदमी पक्षाचे सरकार मोफत देत आहेत. भारतीय राजकारणात एकमेव दिल्ली सरकारचा बजेट नफ्या मध्ये आहे. व दिल्लीचा सरासरी विकासदर इतर राज्यापेक्षा जास्त आहेत व दिल्ली मध्ये महागाई इतर राज्यापेक्षा कमी आहे. अशा सुविधा आपल्या राज्यातील जनतेला मिळाव्या यासाठी नियोजित वीज दर वाढ रद्द करून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांचा मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आर्णी विधानसभा प्रमुख प्रेमदास चव्हाण, शहर अध्यक्ष अमोल नडपेलवार, शहर उपाध्यक्ष दीपक घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©