यवतमाळ सामाजिक

किन्ही वळगी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा प्रोजेक्ट भेट

किन्ही वळगी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा प्रोजेक्ट भेट

किन्ही(वळगी) दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा ला

साफेक्स केमिकल प्रा.लि .या कंपनीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणा करिता प्रोजेक्टर भेट दिले या बद्दल. उच्च प्राथमिक मराठी शाळेचे व्यवस्थापन समिती किन्हीवळगी तर्फे कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री दिनेश राठोड साहेब यांचा निलेश आडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

*साफेक्स केमिकल प्रा. लि. या कंपनीच्या या कौतुकास्पद उपक्रमाची सर्वत्र चर्चा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, या उपक्रमा मार्फत कंपनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन एका गावाची निवड करून शाळेकरिता अत्यंत आवश्यक वस्तू भेट म्हणून देत आहे.*

या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मंडळीचे शाल, व श्रीफळ सत्कार करण्यात आले

या कार्यक्रमात सहभागी प्रमुख पाहुणे म्हणून विलास जाधव गट विकास अधिकारी प स दारव्हा.संजय गडपायले केंद्रप्रमुख हरु. गणेश राऊत केंद्रप्रमुख लाख खिंड. संतोष सुरस्कार सरपंच.सुरेश धुमाळे वसंता लोंढे हे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम प्रविण जाधव पवन महल्ले पुरुषोत्तम डुकरे राजू महल्ले संतोष नारनवरे तसेच मेश्राम मुख्याध्यापक .गायकी सर शिक्षकवृंद

विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©