यवतमाळ सामाजिक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे वाढतेय सिंचन सुविधा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे वाढतेय सिंचन सुविधा

७३६५ शेतक-यांना स्प्रिंकलर व ठिंबकचा लाभ प्रकल्पात ३०२ गावे, ४५९३८ शेतक-यांची नोंदणी १२८३० शेतक-यांना विविध योजनेचा लाभ ३८ कोटी ५२ लाख २९ हजार खर्च

यवतमाळ, दि २६ मार्च :- वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी आणि शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यातील ३०२ गावांमधील शेतक-यांसाठी अत्यंत फायदेशिर ठरत आहे . या प्रकल्पातून जिल्ह्यातील ७३६५ शेत्क-यांना स्प्रिंकलर व ठिंबक संचाचा लाभ मिळाल्यामुळे या शेतक-यांनी पारंपारीक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे.

मार्च २०१८ मध्ये पोकरा प्रकल्प राज्यातील खारपान पट्टा, आत्म्हत्याग्रस्त आणि अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यात सुरु झाला. या प्रकल्पातून शेतक-यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांसाठी सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यातील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. यात ५ हेक्टरपर्यंच्या शेतक-यांना नोंदणी करता येते. जिल्ह्यातील १२ हजार ८३० शेतक-यांना या योजनेतुन आतापर्यंत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. यात १२,५४० शेतक-यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यातील निम्या शेतक-यांनी सिंचनासाठी स्प्रिंकलर व ठिंबक संचचा लाभ घेतला आहे.

६३७२ शेतक-यांना सिंचनासाठी स्प्रिंकलर संच तर ९९३ शेतक-यांना ठिंबक संचासाठी अनुदान देण्यात आले आहे. यामुळे शेतक-यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असुन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

योजनेतुन कशासाठी मिळतो लाभ

पोकरा योजनेतून आधुनिक शेतीसाठी लागणा-या सर्व बाबींसाठी लाभ देण्यात येतो. तसेच बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी बिबिएफ पॉलीहाऊस, शेडनेट सारखे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

या योजनेतुन परसबाग कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, नाडेप, कंपोस्ट इत्यादी युनिटसाठी, तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फळबाग, फुलशेती लागवड,वनशेती, मत्स्य शेती, रेशीम शेती, पॉलिहाऊस, शेडनेट मधील लागवडीसाठी रोपे, बिजोत्पादन, खारपान शेतीसाठी शेततळे, स्प्रिंकलर, पंप, विहीर इत्यादीसाठी सहाय्य देण्यात येते.

जिल्ह्यात किती शेतक-यांना मिळाला लाभ योजना लाभार्थी रक्कम

परसबाग कुक्कुटपालन १२,७५० वर्मी, नाडेप कंपोस्ट ८४

६,१०,९३१ ठिबक संच

९३१

८,५०,६३,४८५

 

अवजारे

२६३

१,७७,०६,८०३

शेततळे

४६

३७,१४,७४७

बीबीएफ.

१४७२

३९,४६,२१०

फळबाग

३२१

१,०९,६१,०९२

मत्स्यशेती

५२,२७८

पॉलीहाऊस

5

७३,१८,६२०

पॉलीहाऊस लागवड

24,53,587

रिचार्ज विहिर

५६,९०२

बिजोत्पादन

१०६०

८२,९८,३५७

रेशीम शेती

26

१९,०२,६८३

शेडनेट

 

१६

 

१,४३,४९,४८१

स्प्रिंकलर

६३७२

११,२३,३७,३३०

पंप

७६३

१,०७,३५,८९२

विहिरी

१५०

३,३५,४७,३६२

पाईप्स

६१३

१,१२,६७,१९७

खारपान

शेतीसाठी

३०७

४५,३६,१७१

इतर

३८

१४,१७,२१८

एकूण

१२५४०

३३,०२,८९,०९६

Copyright ©