यवतमाळ सामाजिक

हेल्थ केअर फाऊडेशन व मातोश्री हॉस्पीटल याच्या

देवळी ता.प्रतिनीधी:सागर झोरे 

हेल्थ केअर फाऊडेशन व मातोश्री हॉस्पीटल याच्या

संयुक्त विद्यमाने आशा दिवसा निमित्य आशा गटप्रवर्तक यांचा सत्कार

देवळी येथिल हेल्थ केअर फाउंडेशन व मातोश्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आशा दिवसानिमित्त गटप्रवर्तक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोमीलवार मातोश्री हॉस्पीटल देवळी च्या डॉ. अश्विनी गोल्हर संस्थापक अध्यक्ष प्रकाश खडगी व सचिव शुभांगी खडगी पत्रकार गणेश शेंडे आदिची प्रमुख उपस्थिती होती . या प्रसंगी गटप्रवर्तक मुरदगाव बेलसरे येथिल जयश्री देशमुख गौळच्या अस्मीता डहाके गिरोली च्या उज्वला थूल नाचनगाव च्या सोनम वानखेडे सुजाता भगत विजयगोपाल च्या अर्पणा आटे या सर्व देवळी तालुक्यातील च्या गटप्रवर्तकाचा सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ. अश्विनी गोल्हर . आशा दिवस क्रार्यक्रमात त्यानी सांगितले की आशा आपल्या पाठीच्या कन्या प्रमाने आहेत त्याच्या मदतीने कोरोना काळात अनेक जीव वाचवू शकलो . तसेच गणेश शेंडे यांनी सांगितले की तुम्ही जे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले त्याच कामाची पोच पावती म्हणून आज आशा दिनानिमित्त तुमचा सत्कार करण्यात आला . संचालन पदमा खडसान तर आभार बबिता ताकसांडे यांनी मानले यशस्वी करण्यासाठी बाबाराव कनेर आरोग्य साहयक अधिकारी राजेश सेलोटे छबीता चव्हान सविता गोटेकर मंजुळा गटुले आरती अडेकार सचिन कुंमरे यांनी सहकार्य केले

Copyright ©