Breaking News यवतमाळ

तूपटाकळी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

दिग्रस/प्रतिनिधि 

तूपटाकळी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

तूपटाकळी येथील एका ४५ वर्षीय इसमाने दिग्रस रोडवरील नाल्याजवळ झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना रविवार दिनांक २५ मार्च २०२३ रोजी सकाळच्या दरम्यान घडली.

तालुक्यातील तुपटाकळी येथील गजानन कोते वय ४५ वर्ष याने दिग्रस रोडवरील नाल्याजवळ एका झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांना माहिती पडताच गावातील पोलीस पाटलांना संपर्क करून त्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली .पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आणला. व नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी दोन मुली व तीन मुल असा असा आप्त परिवार आहे पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहे.

Copyright ©