यवतमाळ सामाजिक

देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे विविध मार्गाने प्रयत्न डॉ. प्रा.मिनाक्षी सावळकर

देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे विविध मार्गाने प्रयत्न डॉ. प्रा.मिनाक्षी सावळकर

देशात आज सर्वत्र आरक्षण संपवणे, देशात धार्मिक उमाज निर्माण करून घोटाळे दाबणे अशा पद्धतीने देशाला हुकूमशाहीच्या दिशेने नेण्याचे काम केंद्र सरकार करत असून देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे विविध मार्गाने प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या डॉ.प्रा. मिनाक्षी सावळकर यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित मोर्चा नियोजनाच्या कार्यक्रमात बोलताना दिली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलेली शिक्षा व त्यांची निलंबित केलेली खासदारकी याच्या निषेधार्थ दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय उमरखेड येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यात महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

आज झालेल्या मोर्चा नियोजन सभेमध्ये माजी आमदार विजयराव खडसे ,नंदकिशोर अग्रवाल, रमेशराव चव्हाण ,तातूजी देशमुख, राम देवसरकार ,बाळासाहेब चंद्रे, कृष्णा पाटील देवसरकर, दत्तरावजी शिंदे, गोपाल अग्रवाल, प्रेमराव वानखेडे, जहीर भाई ,अमोल तुपेकर, सुभाष शिंदे ,डॉ. आनंदराव कदम, अँड. जितेंद्र पवार ,भैया पवार ,ईश्वर गिरी ,, गजानन देशमुख मंचकराव चव्हाण, दत्तराव रावते, शिवाजी वैद्य इत्यादी उपस्थित होते. तसेच या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते भीमराव चंद्रवंशी, शंकरराव तालंकर, बळवंतराव चव्हाण, राजूभैय्या जयस्वाल, जाकीर राज, युसूफभाई सौदागर, बबलू जाधव, गुणवंत सूर्यवंशी, तसेच सतीश नाईक, अँड. बळीराम मुटकुळे, गजेंद्र ठाकरे, अरविंद भोयर, नितीन शिंदे ,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोजताई देशमुख व सोनु खतीब यांनी मोर्चा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.

Copyright ©