Breaking News यवतमाळ

सावळा ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ  पाण्याच्या टाकीचे व विहिरीच्या कामात गैर प्रकार

सावळा ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ  पाण्याच्या टाकीचे व विहिरीच्या कामात गैर प्रकार

सरपंच व ठेकेदार यांची मिली भगत

मौजे सावळा येथे यवतमाळ जि.प.चे जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे व विहिरीचे खोद काम व बाधकाम चालू आहे त्यामध्ये पाण्याच्या टाकीचे पीलर पूर्ण होण्या आधीच वाकले असल्याने टाकीचे भविष्य सांगायला ज्योतिष्य या ची गरज लागणार नाही कारण असेच काम सुरू राहिल्यास एका वर्षातच या टाकीचे बांधकाम ढासळल्या शिवाय राहणार नाही.

या ठिकाणी सुरू असलेल्या कामामध्ये अतिशय कमी दर्जाचे साहित्य अत्यल्प वापर करण्यात येत आहे तसेच गेल्या महिन्याभरात विहिरीचा गढ्ढा खोदुन काम बंद आहे तो खड्डा तसाच असल्याने कोणतीही दुर्घटना व्हायला वेळ लागणार नाही, हि विहीर शोभेची वस्तू झाली असून या गढ्ढ्यामध्ये पडून कुठलिही जिवीतहानी होऊ शकते.या प्रकरणी सावळा ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली असल्याने जनतेच्या हिता चे प्रस्न सदस्य विचारले असता कोणतेही उत्तर दिल्या जात नाही सावळा येथिल ग्रामस्थ यवतमाळ जि.परिषद उपविभागीय कार्यालय दारव्हा येथे जाऊन इस्टिमेट ची लेखी मागणी करुन सुद्धा मागील गेल्या दिड महिन्यापासून कार्यालयातील ज्यु.इंजिनिअर शैलेश कवाडे यांनी अजुन तरी इस्टिमेट ची प्रत मिळालेली नाही. या करून येथील बाधकामात प्रचंड गैर प्रकार होत असल्याचा आरोप सदस्य व ग्रामस्थान कडून करण्यात येताहेत सावळा ग्रामपंचायत चा सर्व व्यवहार सावळा ग्रामपंचायत सरपंचां चे पतिच पाहतात त्यामुळे या प्रकरणामध्ये जि.प.ज्यु.इंजिनिअर व तसेच ठेकेदार व सावळा ग्रा.सरपंच यांचे पति सह अनेकांचा या गैर प्रकारात सहभाग असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी यवतमाळ जि.परिषद प्रशासनाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

Copyright ©