यवतमाळ सामाजिक

लखमाई इंडियन गॅस तर्फे एलपीजी सुरक्षा शिबीर खापरी येथे संपन्न

प्रतिनिधी घाटंजी अमोल नडपेलवार

लखमाई इंडियन गॅस तर्फे एलपीजी सुरक्षा शिबीर खापरी येथे संपन्न

घाटंजी : ग्रामपंचायत कार्यालय खापरी येथे लखमाई इंडेन गॅस एजन्सी घाटंजी यांच्यावतीने एलपीजी सुरक्षा शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी मुख्य मार्गदर्शक सचिन वैरागड चिफ एरीया मॅनेजर इंडियन ऑइल नागपूर, सुमेर सिंग असिस्टंट मॅनेजर धनज बॉटलिंग प्लांट, निलेश ठाकरे यवतमाळ सेल्स एरीया मॅनेजर इंडीयन ऑईल यांनी गॅस वापरासंबंधी मार्गदर्शन केले. गॅस सिलेंडर मुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सिलेंडर चेक करुन घेणे, वजन करुन घेणे, स्वयंपाक झाल्यानंतर रात्री रेग्युलर बंद करणे, सुरक्षा

नळी दर पाच वर्षांत बदलविणे, शेगडी ओट्यावरच ठेवणे इत्यादी माहिती महीलांना देण्यात आली. तसेच 10 कीलो कंपोझिट सिलेंडर बद्दल सुद्धा माहिती दिली त्यावेळी गावच्या सरपंच सौ कल्पनाताई शंकरराव काकडे, सचीन माहुरे संचालक लखमाई इंडेन, गजानन राऊत मॅनेजर लखमाई इंडेन, नारायण भोयर, संजय वहीले व गावातील महीला हजर होत्या

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©