महाराष्ट्र सामाजिक

संत सखुआईचा प्रगट दिन शताब्धी महोत्सव प्रचंड उत्साहात साजरा

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- पंकज तडस 

संत सखुआईचा प्रगट दिन शताब्धी महोत्सव प्रचंड उत्साहात साजरा

वर्धा जिल्ह्यातील सिंदी ( रेल्वे ) नजीकच्या पळसगाव (बाई) येथे श्री. संत सखुआईच्या शताब्दी प्रगट दिन वर्षानिमित्त भव्य महोत्सव साजरा करण्यात आला त्याची सुरुवात १७ फेब्रुवारी ला विविध कार्यक्रम चे आयोजन करून करण्यात आले असून दि 24 मार्चला कीर्तन,पालखी दिंडी सोहळा, अश्व रिंगण,दही हांडी महाप्रसादाचा कार्यक्रम हजारो भाविकाचा उपस्तित साजरा करन्यात आला,यंदा हा महोत्सव आगळावेगळा व्हावा, यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम तसेच आरोग्य शिबीर सारखे उपक्रम राबवण्यात आले,

क्षेत्र पळसगांव बाई श्री. संत सखुआई यांचा शताब्दी उत्सवात विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक आले . जवळ पास 270 भजन मंडळी तसेच दिंड्या यांनी सहभाग नोंदवला असून देवस्थान चे वतीने मानधन व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासन चे वतीने सन्मानपत्र देऊन आभार माणण्यात आले असून आरोग्य विभाग हमदापुर चे वतीने शिबीर ठेवण्यात आले असून आपत्कालीन परिस्तिथी उद्भवल्यास रुग्णवहीका व अग्निशमन दल ची ववस्था करण्यात आली होती. यात्रे करिता 500 ते सहाशे दुकानें आली होती यात्रेकरुंच्या वाहनांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, भव्य प्रवेशव्दार उभारणे, तसेच बाहेर गावाहून आलेल्या भक्तांना अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून काल जवळ पास 50 ते 60 हजार भाविक भक्त आले होते.

वहन मारघावर गावातील युवकांनी, बचत गट महिलांनी, दारूबंदी महिलांनी ग्रामसफाई करीत पताकानी व रांगोळीनी गाव सजवून सुशोभीत केले होते, नवानेच रुजू झालेल्या ठाणेदार वंदना सोनुले तसेच पी आय,सोनपितळे यांनी पूर्ण यात्रे दरम्यान पोलीस बंदोबस्त लावून यात्रे दरम्यान सुववस्तीतता राखली.

पहाटे गावात वहन निघून कीर्तनाला सुरवात झाली त्यानंतर पूर्वा पार चालत आलेल्या प्रथे नुसार दिंडी व रिंगण काढण्यात आले नंतर दहीहंडी व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला..

यात्रेदरम्यान भाविक भक्त, प्रशासन, परगावकरी, गावकरी यांनी जि मोलाची मदत केली त्याबद्दल देवस्थान अध्यक्ष सुरेश लेंडे, सचिव राजू आडकीने व सरपंच धीरज लेंडे यांनी आभार मानले असून श्री चे आशिर्वादामुळे संपूर्ण कार्यक्रम सुववस्तीत झाला असे मत वक्त केले…

Copyright ©