Breaking News महाराष्ट्र

परप्रांतीय भिखाला खुशाल बोरकरकडून बेदम मारहाण

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस

परप्रांतीय भिखाला खुशाल बोरकरकडून बेदम मारहाण

भिकारामच्या नाकातून वाहत होते 9 तास रक्त

ठाणा प्रभारी म्हणतो क्षुल्लक घटना

 फिर्यादी गुराख्यास पोलिसांची दमदाटी

दाखिनेतील परप्रांतीयावरील हमला ताजेच असताना सिंदी तेथे सुद्धा तसाच प्रकार झाल्याने व पोलीस विभागाद्वारे सुद्धा त्यांना संरक्षण मिळण्याची अपेक्षा असतांना मात्र दमदाटी मिळत असल्याचा प्रकार समोर येत आहे. सविस्तर वृत्त असे शेतांची उलंगवाडी झाली असल्याने काठेवाडी भिकारामच्या मेंढ्या सिंदी नजीक एका झाडाखाली थांबल्या. त्याचवेळी सिंदी येथिल खुशाल बोरकर व त्याच्या साथीदारांनी येथे मेंढ्या का आणल्या ? असा सवाल करून भिकारामला काठीने मारहाण केली. यामुळे भिकारामच्या नाकावर काठीचा वार बसल्याने त्यांचे नाक फुटले. परिणामतः रक्तबंबाळ अवस्थेत त्याने सिंदी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांच्याच सूचनेवरून भिकाराम सेवाग्राम इस्पितळात भरती झाला. तेथे 9 तास पर्यंत त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते. परंतु, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी जुजबी गुन्हा नोंदविला, असा आरोप भिकारामच्या कुटुंबियांनी केला होता.

त्याबाबत माहिती देतांना भिकाराम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी 21 मार्च रोजी त्याच्या मालकीच्या मेंढ्यांचा कळप पळसगाव येथून काढला. हा कळप घेऊन भिकाराम कुटुंबासह कवठा शिवारातील दिलीप बावणे यांच्या शेतात जाणार होता. दुपारची वेळ असल्यामुळे त्या मेंढ्या वणा प्रकल्पाच्या एका वितरीकेच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडाखाली थांबुन चहा बनवून पित होता. सदर शेत आणि बाभळीचे झाड खुशाल बोरकर यांच्या मालकीचे नाही. परंतु, माझ्या शेताचे नुकसान केले, त्याचा मोबदला मला दे असा सवाल बोरकरने केला. शाब्दिक बाचाबाचीनंतर खुशालने हातातील काठीने भिकारामला मारहाण केली, इतर सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी भिकारामला बदडले. भिकारामच्या नाकावर काठीचा वार बसल्यामुळे त्याचे नाक फुटले, व भिकाराम बेशुध्द पडला. याचा फायदा उचलत खुशाल बोरकर व त्याचे मित्र घटनास्थळावरुन पसार झालेत.

जखमी अवस्थेत भिकाराम स्थानिक पोलीस ठाण्यात आला. पोलीस जमादार मनोहर चांदेकर यांनी त्याला तातडीने उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी ठाणा प्रभारी सिंदी यांनी दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे टाळले होते. बुधवारी सकाळी सेवाग्राम वरून आल्यानंतर भिकाराम कैफियत मांडण्यासाठी ठाण्यात गेला असतांना त्याला चार तास बसून ठेवले. शेवटी पोलीस गुन्हा नोंदवित नसल्याचे बघून फिर्यादी भिखाने न्याय मिळत नसेल तर पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेबांकडे जावे लागेल, असे म्हटल्यावर शेवटी पोलिसांनी भांदविच्या 324 व 34 कलमाखाली गुन्हा नोंदविला.

परप्रांतीयांना न्याय कधी ?

सिंदी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मंगळवारी रात्री आरोपींना अटक झाली नाही. सदर घटना जुजबी असल्याचा अभिप्राय पोलिसांनी कशापायी दिला! पोलिसांवर कोणाचा दबाव होता ? याचा खुलासा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी मागवावा असी मागणी पीडित भिखा देवा रबारी यांनी केलेली आहे.

Copyright ©