यवतमाळ राजकीय

नगर परिषदेच्या हद्दीत खुले आम पक्के बांधकाम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखाची तक्रार

नगर परिषदेच्या हद्दीत खुले आम पक्के बांधकाम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखाची तक्रार

यवतमाळ स्थित दत्त चौक हे केंद्र बिंदू असून या ठिकाणी खुले आम नगर परिषदेच्या जागेवर पक्के बांधकाम सुरू करण्यात आले आहे मात्र नगर परिषदेस वारंवार पाठपुरावा करून हि दखल घेत नसल्याने कुठे पाणी मुरत आहे या कडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकामे अनेक ठिकाणी सुरू असताना दुर्लक्ष का केल्या जात आहे हा प्रश्न मात्र अनुत्रित आहे.गोर गरीबांचे अतिक्रमण हटिण्या करीता अनेक यंत्रणा कामी लाऊन जनतेचे पैशाची उधळपट्टी केली मात्र डोळ्या देखत नगर परिषदेच्या जागेवर पक्के बांधकाम सुरू होऊन महिना होत असतानाही कुणी दुकुनही पाहायला तयार नसल्याचे येथील चित्रा वरुन दिसून येत आहे या प्रकरणी यवतमाळ येथील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्रभाऊ गायकवाड यांचे कडून तक्रार दाखल करण्यात आली, तक्रारी मधून नगर परिषदेच्या जागेवरअनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे सांगूनही दखल घेतल्या जात नाही,यांना मुख्याधिकारी यांचे पाठबळ तर नाही ना ! असा सवाल सर्व सामण्यान कडून करण्यात येत आहे.याची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Copyright ©