महाराष्ट्र सामाजिक

वर्धा येथील बेमुदत आमरण उपोषणाची सांगतां

देवळी ता.प्रतिनिधी:सागर झोरे 

वर्धा येथील बेमुदत आमरण उपोषणाची सांगतां

भोई समाजाचे विविध संस्था आणि संघटना उपोषणात मोठ्या प्रमाणात सहभाग

वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर १३ मार्च २०२३ पासून कारनदी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कारंजा ( घा ) च्या वतीने विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण करन्यात आले होते. याची सबंधित विभाग राजकीय स्तरावर दखल घेत २० मार्च २०२३ ला भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जीवन रक्षक दल,भोई विद्यार्थी संघटना, नागपुर येथील शिष्टमडळासह भेट देऊन येथील निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून विवीध मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश बकाने,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चोपडा यांचे हस्ते तर नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण कर्त्याना लिंबू शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष एड दादासाहेब वलथरे,प्रकाश डायरे,पी. ए. बावनकुळे, दिलीप मेश्राम,कोमल देवगडे,नामदेव कंन्नाके, मृणली वलथरे , सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणाच्या यशस्वितेसाठी उमेश अमझरे, लक्ष्मण नांदणे, हरिचंद नांदणे, धनराज अमझिरे, अशोक बोरवार, राजू नांदणे, विदर्भ भोई संघटना जिल्हाध्यक्ष संजय नान्हे, सचिव मनोहर पचारे, पत्रकार रविंद्र पारीसे, करलुके, निर्षाद भोई पार्टी सुनिल ढाले, राजेश सुरजुसे सह समस्त कार नदी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कारंजा ( घा) च्या समस्त भोई समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©