महाराष्ट्र सामाजिक

देवळी शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने ” पाडवा पहाट ” कार्यक्रम संपन्न.

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळी शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने ” पाडवा पहाट ” कार्यक्रम संपन्न.

देवळी शहरात चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नववर्षाची सुरुवात करण्याकरिता विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी नवीन वर्षाचे आगमनाचे स्वागत करण्याकरिता बुधवारला पहाटे ५ वाजता गांधी चौक, दत्त मंदिर जवळ ” चेतन सुवांकुर ” जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी प्रथमता प्रमुख पाहुणे खा. रामदासजी तडस आणी सौ. शोभाताई रामदास तडस यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून” गुढी पूजन ” करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सकाळच्या प्रहरी भक्तिमय संगीतात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चेतन सेवांकुर समितीचे सर्व सदस्य दोन्ही डोळ्यांनी अंध असून सुद्धा त्यांनी केलेले गीत गायन चे प्रदर्शन अभूतपूर्व आणि अविस्मरणीय ठरले. या कार्यक्रमाचा देवळीतील असंख्य लोकांनी आनंद घेतला या कार्यक्रमाला ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, नरेंद्रजी मदनकर ( माजी उपाध्यक्ष न. प. देवळी) ,सौ.तृप्तीताई बकाने, सुचिता ताई मडावी ( माजी नगराध्यक्ष ),उद्योजक मोहन बाबू अग्रवाल, व्यापारी वर्ग तथा अटलजी पांडे ( विश्व हिंदू परिषद प्रांत सहसंयोजक ), बबलू भाऊ राऊत ( बजरंग दल जिल्हा संयोजक ), अनिल कावळे ( व्यावसायिक ) कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बजरंग दल चे सहसंयोजक दिनेश क्षीरसागर, मोहन जोशी, संजय कामडी, गोल्डी बग्गा, प्रवीण तेलराधे, गजानन महल्ले, प्रकाश चांभारे, अनिल शिरसागर, अनिल सरकार, अमोल गोडबोले, गजानन मेंढुले, रवि पोटदुखे, गजानन नासरे, लक्ष्मण इंगोले, श्याम पोटदुखे, तुकाराम कामडी, गजानन पोटदुखे, संजय वानखेडे, सागर गोमासे, वैभव झाडे, शेखर सुरकार , शुभम कामडी, अनिकेत मरघाडे, प्रफुल येळणे परिश्रम केले.तसेच देवळी शहरातील असंख्य महिलावर्ग,नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Copyright ©