यवतमाळ सामाजिक

लिंगायत पाडवा पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद

लिंगायत पाडवा पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद

(बसव क्लब,हितसंवर्धक मंडळ,वसुधा प्रतिष्ठान,लिंगायत महिला मंडळाचा उपक्रम)

चैत्र गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात मंदमंद सुरांच्या

यंदाची लिंगायत पाडवा पहाट

रसिक श्रोत्यांच्या मनात

अभावितपणे कोरल्या गेली.यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार्‍या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या

बसव क्लब वीरशैव हितसंवर्धक मंडळ,वसुधा प्रतिष्ठान,लिंगायत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत लिंगायत पाडवा पहाट या

भक्तिमय संगीतमय कार्यक्रमाला मराठी नववर्षाच्या रम्य पहाटे महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन,यवतमाळ येथे अद्भुत प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्ष

हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.अशोकराव मेनकुदळे,हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष ,डॉ.जयेश हातगांवकर,बसव क्लबचे कार्याध्यक्ष श्री.विनोद नारिंगे, प्रमुख पाहूणे म्हणून चंद्रशेखर उमरे,कल्पनाताई देशमुख,विद्या बेलोरकर ईत्यादी.मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन झाले,यानंतर पाडवा पहाट ह्या भक्तीमय कार्यक्रमाला सुरवात झाली,ह्यामध्ये तु सुखकर्ता तु दुखहर्ता ह्या वंदना बोनकीले ह्यांनी सादर केलेल्या ह्या गणेश वंदन ने लिंगायत पाडवा पहाट या संगितमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरातुन या मला भेटण्या, हे गित सादर करित शिल्पा बेगडे ह्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली, भावभक्तीने पुजती विश्वनाथा,देवमाझा विठु सावळा,ऐरणीच्या देवा तुला,खेळ मांडली वाळवंटी,सुंदर ते धान्य विटेवरी,केशवा माधवा,शोधसी मानवा,मन लागोरे,

कानडाहो विठ्ठलु,ब्रम्हा विष्णु आणि महेश,देव देवाऱ्हात नाही,गजानना गजानना,ह्या एकापेक्षा एक सरस

गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वरचेवर चढत गेली ,रात्र दिवस स्वप्नात आले गुरदेव हे अद्वितीय गाणे गाऊन कु.आसावरी हातगांवकर हिने पाडवा पहाट ह्या कार्यक्रमाला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले,ह्यानंतर आपल्या बोबड्या बोलीने, घागर धेऊन,घागर घेऊन हे सुंदर गित सादर करित कु.संस्कृती सचिन शेटे हिने सर्वांना बालवयाची आठवण करून दिली, भावभक्तीने पुजती विश्वनाथा गाण गााऊन उज्वला नारिंगे ह्यांनी वातावरण भक्तीमय करून टाकले, संपुर्ण कार्यक्रमामध्ये पारंपारिक पोषाख परिधान करून आलेल्या जान्हवी मनिष शेटे,व संस्कृती सचिन शेटे ह्या चिमुकल्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या.तसेच आरंभी विठ्ठल विठ्ठल सक्षम अंदुरकर, ह्या चिमुकल्यांच्या गाण्याने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.पद्मश्री हातगांवकर ह्यांनी सुंदर असे पाडव्याच्या निमित्त स्वरचीत कवितेचे वाचन केले,संगिता शेटे,चिरायु हातगांवकर,किशोर मांडगावकर,उज्वला नारिंगे,उषा कोचे,शिल्पा बेगडे,अमर केळकर,वीर केळकर,तेजश्री मानेकर,कल्पना देशमुख, अश्विनी ठोंबरे, शिला तेले,आसावरी हातगांवकर,वंदना बोनकीले,

ईत्यादी गायकांनी एकापेक्षा एक सरस असे गाणी गायले,ह्यामध्ये सौ शिल्पा बेगडे ह्यांचे लिंगायत महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले,

या बहारदार अशा लिंगायत पाडवा पहाट ला शेवटपर्यंत श्रोत्यांची गर्दी कायम होती.नटसम्राट संजय माटे ह्यांनी गायलेल्या नको वाजवु श्रीहरी मुरली ह्या सुंदर अश्या भैरवीने पाडवा पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.यादरम्यान .या बहारदार कार्यक्रमाचे

सुत्रसंचालन सौ.तेजश्री मानेकर तर

आभार प्रदर्शन श्री. निलेश शेटे यांनी

केले. या कार्यक्रमाला वाद्यवृंदावर

सुंदर अशी साथ श्रीकांत माळवी आणि तन्मय गोडे आणि , त्यांच्या चमुने दिली़, या कार्यक्रमाच्या

यशस्वीतेकरीता बसव क्लब,वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान

तसेच विनोद नारिंगे,अनिल बेगडे

संजय कोचे, चिरायु हातंगावकर, किशोर मांडगावकर,मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे , निर्मल ठोबंरे,नागेश कुल्ली,अमर केळकर,भुषण तंबाखे,गजानन हातगांवकर ,डॉ. मंगेश हातगांवकर,महेश्वर गाढवे,विजय देशमुख,विनोद देशमुख, सुधाकर डांगोरे,वसंतराव देमापुरे,

प्रा.राजेश मानेकर, रमेश केळकर,राजु मेनकुदळे,मनिष शेटे,अभिजीत हातगांवकर, सौ.स्वाती हातगांवकर,सौ.ज्योती डब्बावार,सौ.सिमा केळकर, स्नेहल हातंगावकर ,सिमा नवलाखे,जयश्री जिवरकर,अशोक तेले,अशोक जिवरकर ईत्यादींचे सहकार्य लाभले.

Copyright ©