यवतमाळ सामाजिक

जागतिक तृणधान्य जणजागृती कार्यक्रमाचे आयोजन करंजी रोड : प्रतिनिधी विलास होलगिलवार उमेद

जागतिक तृणधान्य जणजागृती कार्यक्रमाचे आयोजन करंजी रोड : प्रतिनिधी विलास होलगिलवार उमेद

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पं. स.पांढरकवडा अंतर्गत स्वावलंबी महीला ग्रामसंघ करंजी रोड येथे दी.18 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन वर्ष 2023 निमित्त जागतिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . तृणधान्याची मोठ्या प्रमाणात लागवड वाढविणे आणि भारतीय आहारात तृणधान्येचे प्रमाण वाढविणे तसेच त्याच्यातील मिळणाऱ्या जीवनसत्वे, पोषणद्रव्ये याबाबत जागृती व्हावी याकरिता रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये तृणधान्या विषयी विविध म्हणी, घोषवाक्य व संदेश देण्यात आले. तृणधान्य पासून रांगोळी काढून प्रत्येक दिवशी वेगवेगळे तृणधान्य आहारात घ्यावे हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास उमेद कक्ष कर्मचारी हेले सर तसेच सरोदे सर यांनी यांनी तृणधान्य विषयी व उमेद अभियान अंतर्गत सुरू असणाऱ्या विविध योजना जसे की, MSRLM अंतर्गत उत्पादक समुह,सेंद्रिय शेती,OSF वैयक्तिक कर्ज योजना,PMFME,CIF,SVEP इत्यादी योजना महिलांना समजावून सांगून मोलाची माहिती दिली, सर्व महिलांना मार्गदर्शन केले .प्रभागसंघ, ग्रामसघ, समूहा यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जागतिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रमास गावतील ग्रामसंघ पदाधिकारी, कॅडर,Pg, LG अध्यक्ष सचिव, तसेच समूहातील महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

Copyright ©