यवतमाळ सामाजिक

मदरसा फातीमा (राज़ी) येथे जल्सा-ए-आम उत्साहात

मदरसा फातीमा (राज़ी) येथे जल्सा-ए-आम उत्साहात

यवतमाळ : येथील इंदिरा नगरमधील मदरसा फातीमा (राज़ी) येथे जल्सा ए आम उत्साहात झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल अजीम साहब नदवी होते तर प्रमुख वक्ते म्हणून मुफ्ती फिरोज साहब कासमी, प्रमुख अतिथी डॉ.मुजीब साहब, खतीब साहब, शेख लुकमान, हाफीज रफीक साहब, पूर्व नगरसेवक जावेद अंसारी साहब उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जावेद अंसारी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करीत आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या आयोजनामधून समाजाचा विकास होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मदरसामधील विद्यार्थीनीं नात, तराणे, कुराण आयातीचे पठण, दिन्यात, हदीस आदि सादर केल्यात. तसेच इस्लामी नाटीका सादर केल्यात. याकरीता उपस्थित मान्यवरांनी या मुलांना नगद पुरस्कार तसेच विविध पुरस्कार देण्यात आले. दिन्यात फस्टक्लास मध्ये प्रथम अलीना बिन्ते मो.आसीफ, द्वितीय क्रमांक निगरीस बिन्ते परवेज खान, मुलांमध्ये मो.तौफीक बीन्ते आसीफ, तृतिय शेख उजैर बिन्ते शे.शारीक, दिन्यात नर्सरीमधील प्रथम जोया इरफान खान, द्वितीय शेख फरहान शेख इरफान, माहिन शहेजाद खान, तृतिय तैयबा जाकीर शाह, उपस्थितीकरीता जिक्रा अब्दुल रशीद यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्याथींना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन हाफीस सैय्यद इरफान साहब, मस्जीदवार जमात और मस्जीद कमेटी इंदिरा नगर यवतमाळ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मौलवी अज़ीम, मुफ़्ती फ़िरोज़ साहब, रफीक हाफिज साहब, मो लुकमान साहब, मिज़ामिल हाफिज साहब, इरफान हाफिज साहब, मो मुज़म्मिल हाफिज सहाब, मो आसिफ मो शफ़ी सहाब, मो अशफाक सहाब, शेख चाँद शेख जानी, इरफान वेल्डर मस्जिद सदर, मदरसा का जलसे का प्रोग्राम, इमरान हाफिज साहेब, परवेज़ खान, गोलु अब्रार, शारुख खान, शेख जब्बार, शहज़ाद खान, आदिल खान, फैज़ल खान, शेख हसन, शेख ममदू, फैज़ान शाह, आरिफ अनवर आदींनी सहकार्य केले.

Copyright ©