यवतमाळ सामाजिक

पांढरकवडा सहकारी खरेदी विक्री समितीचा निवडणुक निकाल अटी-तटीत

पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे 

पांढरकवडा सहकारी खरेदी विक्री समितीचा निवडणुक निकाल अटी-तटीत

पांढरकवडा सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. पांढरकवडा र. नं. ९८९ ता. पांढरकवडा जि. यवतमाळ ची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीची निवडणूक दि. १९ मार्च २०२३ रोजी पार पडली होती. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ उमेदवार जयवंत वसंतराव बंडेवार ,अनुसूचित जाती / जमाती उमेदवार रितेश बाबाराव परचाके, वैयक्तीक भागधारक

उमेदवार‌ १) विजय गोपाळकृष्ण पाटील २) राम सुर्यभान जिड्डेवार ३) निलेश कृष्णराव ठाकरे, ४) अयुबखाॅ इब्राहिमखाॅ तिघाले , महिला राखीव मतदार संघ

उमेदवार १) सौ. वैशाली देविदास कोळे २) सौ.कलावती उर्फ कला किशोर पाटील,सलग्न सहकारी संस्था मतदार संघ उमेदवारातुन १) प्रशांत बाबाजी बोंडे ,२) रामराव हनमंतराव गोणेवार , ३) जितेंद्रसिंग भुपेंद्रसिंग गोरमनगर , ४) हितेंद्र उद्धवराव मानकर , विमुक्त जाती / भटक्या जमाती/वि.मा.प्रवर्ग उमेदवार कैलास केशव चव्हाण हे विजयी झाले आहेत. यामध्ये कॉंग्रेस व खेतानी गट समर्थीत शेतकरी सहकार विकास पॅनलचे ६ उमेदवार निवडून आले तर पारवेकर तथा कॉंग्रेस मधिल बंडखोर गट समर्थीत शेतकरी विकास पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणुन विकेश देशट्टीवार हे सुद्धा रणांगणात होते.

Copyright ©