यवतमाळ शैक्षणिक

१४ वी राष्ट्रीय स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल

१४ वी राष्ट्रीय स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल

१४ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये ३१ गोल्ड,सिल्वर ८ ब्रांझ ४ मेडल मिळून यवतमाळ जिल्हा अव्वल स्थानी आल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

आग्रा येथील शांतीनी केतन विद्यालय येथे आयोजित १४ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा दिनांक १८ व १९ मार्च२३ रोजी संपन्न झाली. या स्पर्धकरीता जवळ पास ६ ते ७ राज्याचा सहभाग होता त्या मध्ये एम.पी , गुजरात, महाराष्ट्र , आंध्रा ,कनार्टक , यु.पी . येथून १०० ते १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला .

सदर स्पर्धा ४ प्रकारांत घेण्यात आली म्युझिकल चेअर स्कोटिंग , स्पीड म्युझिकल चेअर स्केटिंग, फ्रि टाईक्स म्युझिकल चेअर स्केटिंग व म्युझिकल चेअर चालने या प्रकारात घेण्यात आली.

सदर स्पर्धेचे बक्षिश वितरण . मा . ललित कुमार वऱ्हाडे, व मा . शिवाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडले .

या स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्हाचे १६ खेळाडूचा समावेश होता .

त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वयोगटत व वजन गटामध्ये ४३ पदके पटकवून यवतमाळ जिल्हा चे नाव उंचविले तसेच राज्या ने सर्वाधीक पदके मिळऊन द्वितीय स्थानाची ओहरऑल चॉम्पीयनशिप पटकविली .

पदके जिंकणारी स्केटर्स

रूदंश अभय दुधाटे ३ गोल्ड मेडल १ सिल्वर मेडल . निर्भय सुधीर साखरकर २ गोल्ड १ सिल्वर, क्रांती राहुल डेहनकर ४ गोल्ड , नम्रता ललितकुमार वहाडे ४ गोल्ड, १४ वर्षा आतील व तन्मय अकुंश शिवनकर २ गोल्ड १ सिल्वर,८ वर्ष आतील . विराज जयंत वहाडे १ गोल्ड ३ सिल्वर , समर्थ नितेश उईके १ गोल्ड १ सिल्वर ,साईश हर्षल राठोड ४ गोल्ड , अगस्त नितिन कुळसंगे ४ गोल्ड , मेडल ८ वर्ष आतील.

गौरव प्रमोद निनावे २ गोल्ड २ सिल्वर , जय प्रविण दिघाडे २ ब्रांझ, शौर्य राहुल डेहनकर २ ब्रांझ मेडल ११ वर्ष आतील

. मोहित दिपक गुल्हाने ४ गोल्ड मेडल १७ वर्ष आतील .

१८ व १९ मार्च २०२३ ला आग्रा येथे शांतीनी केतन विद्यालय येथे संपन्न झाली राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेसाठी ह्या १३ स्केटर्स ची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धे करीता झालेली आहे. त्यांच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक तसेच असोशिएशेन चे सचिव प्रविण प्र.दिघाडे यांना देतात व त्याचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे तसेच आई वडिलानी केले .

विजयी व निवड झालेल्या जय स्केटिंग अकॅडमी च्या सर्व स्केटर्स चे अभिनंदन.

Copyright ©